शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

coronavirus : यवतमाळमधील आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 16:22 IST

आतापर्यंत एकूण 16 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जण निगेटिव्ह झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

यवतमाळ - येथे आयसोलेशन वॉर्डमध्ये सोमवारपर्यंत एकूण सात जण पॉझिटीव्ह होते. मात्र यापैकी एकाचा निगेटिव्ह रिपोर्ट रात्री उशिरा वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाल्यामुळे आता पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सहावर आली आहे. आतापर्यंत एकूण 16 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी तब्बल 10 जण निगेटिव्ह झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. हे यश सर्वांच्या सहकार्याने मिळाले असून उर्वरीत सहा रुग्णसुध्दा निगेटिव्ह करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखावी. पुढील 14 दिवस हे युध्द आपल्याला लढायचे आहे. यात नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, घराच्या बाहेर न पडणे, मास्क लावूनच अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणे आदी सुचनांचे आपण पालन केले तर आपला जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख लोकांनी ‘Aarogya Setu’ हे ॲप प्लेस्टोअर वरून डाऊनलोड केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय महत्वाचे असलेले हे ॲप ॲन्डड्राईड मोबाईलवर डाऊनलोड करावे. यात सोपे चार प्रश्न नागरिकांना विचारले जातील. आपण आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहोत कि असुरक्षित हे या ॲपमध्ये कळते. तसेच देशातील कोरानाची सद्यस्थिती जाणून घेता येते. एकप्रकारे या ॲपद्वारे आपण स्वत:चे डॉक्टर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी हे ॲप त्वरीत डाऊनलोड करावे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ