कोरोनाच्या धावपळीत शाळांनी केला 6852 ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांचा भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:20+5:30

पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब्बल ६,८५२ बोगस नावे ‘स्टुडंट पोर्टल’मध्ये चढवली. 

Corona's run schools paid 6852 'duplicate' students | कोरोनाच्या धावपळीत शाळांनी केला 6852 ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांचा भरणा

कोरोनाच्या धावपळीत शाळांनी केला 6852 ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांचा भरणा

अविनाश साबापुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेले वर्षभर संपूर्ण शिक्षण क्षेत्र कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच अनेक शाळांनी  शिक्षकांच्या नोकऱ्या टिकविण्यासाठी आपल्या शाळेत शेकडो ‘डुप्लिकेट’ विद्यार्थ्यांची नावे रेकाॅर्डवर चढवली. मात्र, आता शिक्षण संचालकांनी या रेकाॅर्डची पडताळणी केल्यानंतर शाळांची बोगसगिरी चव्हाट्यावर आली आहे. 
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे पद संबंधित शाळेत मान्य करून घेण्यासाठी तेथे विद्यार्थ्यांची विशिष्ट संख्या आवश्यक आहे. त्या आधारेच संचालनालयाकडून शाळांची संचमान्यता केली जाते. परंतु, कोरोनाच्या धावपळीत जिल्ह्यातील शाळांनी तब्बल ६,८५२ बोगस नावे ‘स्टुडंट पोर्टल’मध्ये चढवली. 


३०० शिक्षक ठरणार अतिरिक्त 

-  साडेसहा हजार विद्यार्थ्यांची ‘डुप्लिकेट’ नावे पोर्टलवर चढविण्यात आली. ही नावे आता कमी करण्याचे आदेश आल्यामुळे जिल्ह्यात जवळपास ३०० शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे. 

पुसद, महागाव, उमरखेड, यवतमाळ तालुक्यांत जास्त बोगस विद्यार्थी
- जिल्हा परिषद शाळांपेक्षा शहरी क्षेत्रातील अनुदानित शाळांनी सर्वाधिक बोगस विद्यार्थ्यांची नावे पोर्टलवर चढवली आहेत.  
- सर्वाधिक १,७४६ डुप्लिकेट विद्यार्थी पुसद तालुक्यातून दाखविण्यात आले आहेत.  
- त्याखालोखाल महागाव, उमरखेड आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळातही ही बनवाबनवी उघड झाली आहे. 

असा झाला विद्यार्थी घोटाळ्याचा पर्दाफाश

३० सप्टेंबरपर्यंत शाळेतील विद्यार्थी संख्या सरल प्रणालीच्या स्टुडंट पोर्टलवर शाळांनी नोंदविणे आवश्यक होते. 
ही ऑनलाईन आकडेवारी शिक्षण संचालनालयात तपासली गेल्यानंतर त्यात लाखो विद्यार्थ्यांची नावे डुप्लिकेट आढळली. 
हजारो विद्यार्थ्यांच्या नावापुढे एकच आधार क्रमांक नोंदविण्यात आल्याचे उघड झाले. 
एकच विद्यार्थी अनेक वर्गांत किंवा अनेक शाळांमध्ये दाखवला गेला. याबाबत आयुक्तांनी व्हीसी घेऊन  दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Corona's run schools paid 6852 'duplicate' students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.