शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये कोरोना विषाणूचे तांडव, आतापर्यंत चार जणांचे गेले बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

सुरुवातीला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव केला. त्यावर नियंत्रण मिळवत असतानाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह ३७ । एकूण बाधितांची संख्या झाली ५५, आता १४ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : शहरात कोरोनाचे तांडव सुरू झाले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाने चार जणांचे बळी घेतले आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातच दहशत निर्माण झाली आहे.सुरुवातीला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव केला. त्यावर नियंत्रण मिळवत असतानाच शहरात कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सध्या ३७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून एकूण कोरोना बाधितांची संख्या ५५ झाली. यात गढी वॉर्डातील ६० वर्षीय चालक, पार्वतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त लाईनमन, मोतीनगरमधील ७० वर्षीय सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आणि आता जांबबाजार येथील शाळेवर कार्यरत एका शिक्षकाचा बळी गेला. चार जणांचे बळी गेल्याने शहरामध्ये भीती निर्माण झाली आहे.शहरातील काही भाग प्रतिबंधित करण्यात आले आहे. जवळपास १०० नागरिक आसारपेंड व आयुर्वेद महाविद्यालयाच्या सेंटरमध्ये क्वारंटाईन आहे. यापैकी २६ जणांचे स्वॅब शनिवारी यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर आतापर्यंत १४ जण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. मात्र दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडत असल्याने प्रशासनासह नागरिकही चिंतेत आहे. तथापि, अनेक नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करीत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दुपारी २ वाजतानंतरही शहरातील काही परिसर गर्दीने फुलून गेल्याचे दिसते. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.२४ तासांत दोन भावांचा मृत्यूवसंतनगर परिसरातील दोन भावांचा अवघ्या २४ तासांच्या अंतरात मृत्यू झाला. ४८ वर्षीय इसम टायफाईडच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना उपचारासाठी १६ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास यवतमाळला रवाना केले. मात्र वाटेत दिग्रसजवळ त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला २४ तास लोटत नाही तोच १७ जुलै रोजी त्यांचे शिक्षक असलेले ४४ वर्षीय बंधू कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. सदर शिक्षकाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांच्या अंतरात दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूने वसंतनगरवर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या