शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणात यवतमाळ राज्यात तळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई ८९.३ टक्के, पुणे ८४.६ टक्के, भंडारा ८४.५ टक्के, सिंधुदुर्ग ७८.४ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७७.२९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

विशाल सोनटक्केलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गणेशोत्सवानंतर आता दुर्गोत्सव आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे. त्यातच येत्या सोमवारपासून जिल्ह्यातील शाळाही गजबजणार आहेत. बहुतांश निर्बंधही शिथिल झाले आहेत. अशा स्थितीत कोरोना लसीकरणाला जिल्ह्यात अद्यापही अपेक्षित वेग मिळालेला नाही. राज्यातील लसीकरणाची आकडेवारी पाहिली असता यवतमाळ जिल्हा तळाच्या पाच जिल्ह्यांत आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यामध्ये लसीकरणाची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळेच लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिनाभरात लसीकरण पूर्ण केले जाईल, असे सांगत प्रशासनाला निर्देश दिले असले तरी प्रत्यक्षात यंत्रणा सक्रिय झाल्याचे दिसत नाही. राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पाच जिल्ह्यामध्ये मुंबई ८९.३ टक्के, पुणे ८४.६ टक्के, भंडारा ८४.५ टक्के, सिंधुदुर्ग ७८.४ टक्के, तर सातारा जिल्ह्यात ७७.२९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणामध्ये तळाला असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये यवतमाळचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वात कमी ३८.६ टक्के, हिंगोली ४१.०८ टक्के, यवतमाळ आणि अकोला प्रत्येकी ४२ टक्के, तर नंदुरबार जिल्ह्यात ४२.३ टक्के लसीकरण झाले आहे. सिंधुदुर्ग, भंडारासारख्या दुर्गम जिल्ह्यात ७५ टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले असताना यवतमाळ मागे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.व्यापक जनजागरणाची गरजकोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रशासनाने आता लसीकरण मोहिमेला गती देण्याचे ठरविले आहे. या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थासोबतच लोकप्रतिनिधी संस्था संघटनांनीही लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. 

प्रशासन देणार जनजागृतीवर भर जिल्ह्याला उपलब्ध झालेल्या लसीच्या पुरवठ्यानुसार जिल्ह्यात आजवर लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. प्रारंभीच्या काळात ग्रामीण भागातून लसीकरणासाठी वेग कमी होता. आता ग्रामीण भागातही लस पुरवठा वाढविण्यात येणार असल्याने या मोहिमेला वेग येईल. प्रशासनाच्या वतीने जनजागृतीवरही भर देण्यात येईल. साधारण दोन महिन्यांत जिल्ह्यातील लसीचा पहिला डोस पूर्ण करण्यात येईल.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

मागणी होती तेव्हा डोस कमी मिळालेमध्यंतरी लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करत होते. नेमके त्यावेळी लसीचे डोस कमी उपलब्ध हाेत होते. याचा परिणाम मोहिमेवर झाला. ग्रामीण भागामध्ये लस घेण्याबाबत उदासीनता आहे. काही ठराविक भागांमध्ये हा वेग खूपच कमी आहे. अशा ठिकाणी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्याचा पहिला डोस डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण व्हावा, यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.- डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

ग्रामीण भागातील उदासीनतेचा परिणामजिल्ह्यामध्ये सध्या लसीकरणाचा वेग कमी आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही नागरिकांत उदासीनता पाहायला मिळते. कोरोनाची रुग्णसंख्या घटल्याने नागरिक उत्स्फूर्तपणे पुढे येत नाहीत. पुसद, यवतमाळसारख्या शहरात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्यापही अपेक्षित वेग मिळालेला नाही. लसीकरण वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत.- डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस