शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीचे कॅम्प लागतात, तरी पाॅझिटिव्ह रुग्ण बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:30 IST

रिपोर्ट मिळाल्यानंतर पाॅझिटिव्ह आलेला व्यक्ती हा रिपोर्ट मान्य करायला तयारच नसतो. यातून पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. पाॅझिटिव्ह रिपोर्टनंतरही तो अनेकांच्या संपर्कात येतो. यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे. शहरातील सर्वच केंद्रांवर असा अनुभव येत आहे. यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयापर्यंत न पोहोचणाऱ्या रुग्णांची यादी पोलीस विभागाकडे दिली आहे.

ठळक मुद्देरुग्णांना कोविड सेंटरमध्ये पोहोचण्याच्या आदेशाचे पालनच होत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा वेग कमी करण्यासाठी सुपर स्प्रेडर रुग्णांना शोधले जात आहे. यासाठी प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार शहरात विविध भागांमध्ये कॅम्प लागत आहेत. यातून कोरोनाचा रिपोर्ट हाती येताच पाॅझिटिव्ह रुग्ण घाबरून उपचार घेण्यास टाळत आहे, यामुळे कोरोनाचा प्रकोप वाढण्याची भीती आहे. याचे वास्तव जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने आज काही केंद्रांवर भेट दिली. त्यावेळी केंद्रातील दोनही बाजू समोर आल्या. रिपोर्ट मिळाल्यानंतर पाॅझिटिव्ह आलेला व्यक्ती हा रिपोर्ट मान्य करायला तयारच नसतो. यातून पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. पाॅझिटिव्ह रिपोर्टनंतरही तो अनेकांच्या संपर्कात येतो. यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्याचा धोका आहे. शहरातील सर्वच केंद्रांवर असा अनुभव येत आहे. यामुळे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयापर्यंत न पोहोचणाऱ्या रुग्णांची यादी पोलीस विभागाकडे दिली आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पोलिसांची मदत मागविण्यात आली आहे. यातून सजगता आणि दुर्लक्ष पुढे येते.

कोरोना रिपोर्ट पाहताना थक्क झालाशहरात विविध ठिकाणी कोरोनाचे कॅम्प लागताहेत. अशाच कॅम्पमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह निकाल आल्यानंतर संबंधित नागरिकाला त्यावर विश्वासच बसला नाही. त्याने पुन्हा याठिकाणी आयोजकाला विचारणा केली. मला कुठलेच लक्षण नाही, असे म्हणत तो या रिपोर्टला पाहून चक्रावून गेला.

रिपोर्टनंतर एका प्रवाशाला पोहोचविलेकोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर अनेकांशी शहानिशा करून या नागरिकाने ऑटो व्यवसायाला सुरुवात केली. याठिकाणी आलेल्या एका वृद्ध महिलेला शारदा चाैकापर्यंत पोहोचवून दिले. त्यानंतर हा ऑटोचालक पुन्हा आपल्या ठिकाणावर पोहोचला. यावेळी त्याने आपल्या रिपोर्टवर विचारमंथन केले.

 या बेजबाबदारांना कोण आवरणार !

 कोरोनाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर आयोजकांपर्यंत अहवाल पाठविले जातात. त्याचे प्रमाणपत्र आरोग्य विभागामार्फत दिले जाते. पाॅझिटिव्ह रुग्णाला कुठे भरती व्हायचे, याचे ठिकाणही सांगितले जाते. आयोजक संबंधित व्यक्तीपर्यंत हा निरोप तत्काळ पोहोचवितात; मात्र संबंधित व्यक्ती आपल्याला काहीच झाले नाही, असे म्हणून या रिपोर्टकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य विभागाची यंत्रणा रिपोर्ट मिळाल्यानंतर संबंधित व्यक्ती उपचार केंद्रावर न पोहोचल्याने ॲम्बुलन्स घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात. यानंतरही अनेक जण उपचार घेण्यास नकार देतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या