शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना सुसाट; 108 बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आहे. प्रत्यक्षात मात्र याचा अंमल होताना दिसत नाही. आदेश निघाला तेव्हा पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाईचा देखावा करण्यात आला. संसर्ग वाढत असतानाही राजकीय पक्षांचे आंदोलन, मेळावे भरगच्च संख्येने सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी राजकीय पक्षासह विविध संघटनांनी हजेरी लावली. ही गर्दी सुद्धा नियमात बसणारी होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बदलत्या वातावरणासोबतच कोरोनाही पुन्हा जिल्हावासीयांना धडकी भरवत आहे. बुधवारी आरोग्य विभागाच्या अहवालानुसार १०८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येने नागरिकांच्या चिंतेत भर पाडली आहे. प्रशासकीय स्तरावरून संसर्ग थांबविण्यासाठी नियमावली लागू झाली आहे. मात्र, याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळेच संसर्गाचा दैनंदिन दर ९.१० वर पोहोचला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने बुधवारी एक हजार १७८ नमुन्यांचा अहवाल जाहीर केला. यामध्ये १०८ जण पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ७४ पुरुष व ३४ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ५३ जणांचा समावेश आहे. आर्णी तालुक्यातील तीन, दारव्हा आठ, घाटंजी दोन, कळंब सहा, महागाव एक, नेर सहा, पांढरकवडा १३, पुसद सहा, राळेगाव तीन, उमरखेड तीन, वणी तीन व जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्यावर तसेच लसीचे डोस देण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र, ही नियमावली केवळ कागदोपत्रीच अंमलात आहे. 

नियम पाळतंय कोण ?- जिल्ह्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी आहे. प्रत्यक्षात मात्र याचा अंमल होताना दिसत नाही. आदेश निघाला तेव्हा पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाईचा देखावा करण्यात आला. संसर्ग वाढत असतानाही राजकीय पक्षांचे आंदोलन, मेळावे भरगच्च संख्येने सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी राजकीय पक्षासह विविध संघटनांनी हजेरी लावली. ही गर्दी सुद्धा नियमात बसणारी होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर नावाला - जिल्हा प्रशासनाने अजूनही कोविड केअर सेंटर आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकाच वेळी रुग्ण वाढल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या