शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने उघडा झाला ‘एसटी’च्या यवतमाळ विभागाचा खरा चेहरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

सन २०१८ मध्ये एकाचवेळी नियुक्त झालेले चालक नियमानुसार रोजंदार गट-२ मध्ये पोहोचले. यानंतर सदर कर्मचारी नियमित होण्यासाठी पात्र ठरले. २२ जानेवारी २०१८ प्रतीक्षा यादीनुसार सात चालक कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात यादीतील पाचव्या स्थानावर असलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करण्यात आले.

ठळक मुद्देनाराजीचा सूर । क्रमवारी डावलून पाचव्या क्रमांकावरील कर्मचाऱ्याला केले नियमित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) खरा चेहरा कोरोनाने उघडा केला आहे. रोजंदार कर्मचाºयाला नियमित करताना केलेला गैरप्रकार पुढे आला आहे. यादीतील प्राधान्यक्रम टाळून मर्जीतील कर्मचाºयाला नियमित करण्यात आले. सेवा थांबविली असताना सोबतचा कर्मचारी ड्यूटीवर कसा, या प्रश्नाने सदर प्रकाराचा भंडाफोड झाला आहे.सन २०१८ मध्ये एकाचवेळी नियुक्त झालेले चालक नियमानुसार रोजंदार गट-२ मध्ये पोहोचले. यानंतर सदर कर्मचारी नियमित होण्यासाठी पात्र ठरले. २२ जानेवारी २०१८ प्रतीक्षा यादीनुसार सात चालक कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यानच्या काळात यादीतील पाचव्या स्थानावर असलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करण्यात आले. यादीत वरच्या क्रमांकावर असलेल्या चार लोकांना सोडून थेट पाचव्या स्थानावर असलेल्या कर्मचाऱ्याला नियमित करण्यात आले.महामंडळाच्या यवतमाळ विभागात झालेला हा प्रकार आता कोरोना लॉकडाऊनमुळे उघडकीस आला. रोजंदार गट-२ मधील कर्मचाऱ्यांची सेवा महामंडळाने थांबविली आहे. नियमित कर्मचारी आळीपाळीने सेवा देत आहे. रोजंदार गट-२ मधील कर्मचारीही नियमित सेवेत दिसला. यामुळे आश्चर्यचकीत झालेल्या इतर कर्मचाऱ्यांनी खोलात जाऊन चौकशी केली. त्यावेळी प्रतीक्षा यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या चालक कर्मचाºयाला नियमित करण्यात आल्याचे उघड झाले. आस्थापना शाखेचा खरा चेहरा या निमित्ताने पुढे आला आहे. झाला प्रकार लक्षात आल्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना जुलै २०२० रोजी तात्काळ आदेश देण्यात आले. हा आदेश गट-२ मधील असल्याची जाणीव करून देणारा आहे. झालेल्या या सर्व प्रकाराविषयी रोष व्यक्त होत आहे.त्यांचेही कोरोनातील नुकसान टळले असतेप्रतीक्षा यादीतील कर्मचारी नियमित झाले असते तर, आज कोरोनामुळे होणारे त्यांचे नुकसान टळले असते. कामगिरी मिळावी यासाठी प्रतीक्षा करावी लागली नसती. पेंडिंग ठेवण्यात आलेले ऑफचेही पैसे मिळाले असते. सोबतच्या नियमित झालेल्या कर्मचाऱ्याला हा लाभ मिळत आहे. विशेष म्हणजे, नियमित झालेल्या या कर्मचाऱ्याला संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून कामावरून कमी केले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या