शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

मास्कच्या बाहेर कोरोना अन् मास्कच्या आत तोंडात ‘कॅन्सर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 05:00 IST

सोमवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. त्यानिमित्त कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आलेली व्यसनाधीनतेची भयावह परिस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न... केंद्र शासनाने केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्येपैकी ४६.६ टक्के पुरुष आणि १२.३ टक्के महिला दरदिवशी तंबाखू चघळतात. विशेष म्हणजे, हे सर्वेक्षण केवळ १५ वर्षांवरील नागरिकांचेच करण्यात आले.

ठळक मुद्दे१५ लाख लोक तंबाखूच्या जबड्याखाली तंबाखूसह दारूमुळे अर्धा जिल्हा व्यसनाच्या विळख्यातमहिलाही गेल्या आहारी

अविनाश साबापुरेलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातून दीड हजार लोकांचा बळीही गेला. मात्र जिल्ह्यातील तब्बल १५ लाख लोक तंबाखू चघळत-चघळत हळूहळू मृत्यूला निमंत्रण देत आहेत. तोंडावर मास्क घालून कोरोनाचा विषाणू बाहेर रोखणारे अनेक नागरिक मास्कच्या आडून तोंडात तासनतास तंबाखूच्या रुपाने कॅन्सर पाळत असल्याचे वास्तव आहे. सोमवारी ३१ मे रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिवस पाळला जात आहे. त्यानिमित्त कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून पुढे आलेली व्यसनाधीनतेची भयावह परिस्थिती मांडण्याचा हा प्रयत्न... केंद्र शासनाने केलेल्या या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ३० लाख लोकसंख्येपैकी ४६.६ टक्के पुरुष आणि १२.३ टक्के महिला दरदिवशी तंबाखू चघळतात. विशेष म्हणजे, हे सर्वेक्षण केवळ १५ वर्षांवरील नागरिकांचेच करण्यात आले. प्रत्यक्षात जिल्ह्यात १५ वर्षांखालील अनेक मुलेही तंबाखू खात असल्याचे वास्तव आहे. ही शासकीय आकडेवारी पाहता, जिल्ह्यात अर्धी लोकसंख्या म्हणजे जवळपास १५ लाख लोक तंबाखूच्या आहारी गेले आहेत. दिवसभर आणि रात्रभर जबड्याखाली तंबाखूची चिमूट ठेवणारे नागरिक स्वत:च कॅन्सरच्या जबड्यात अडकत चालले आहेत. या शिवाय, तंबाखू-चुना मळून खाणाऱ्यांसोबतच गुटखा, खर्रा या रूपात तंबाखू सेवन करणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेतल्यास जवळपास ७५ टक्के जिल्हा तंबाखूच्या आहारी गेल्याचे स्पष्ट होते. आश्चर्य म्हणजे, जिल्ह्यात गुटखाबंदी आहे. बंदी झुगारून, जादा पैसे मोजून व्यसन भागविणाऱ्या महाभागांमध्ये जसा धनाढ्य मंडळींचा समावेश आहे, तसाच रोज मजुरी करणाऱ्यांचाही आहे. उलट ५-१० रुपयांत भागणारे व्यसन म्हणून गोरगरीबच अधिक आहारी गेले आहेत. दरवर्षी २०० जणांना कॅन्सर होतोयमहाराष्ट्रात दरवर्षी १५ हजारांवर लोकांना कॅन्सर होतोय. तर, जिल्ह्यात वर्षाला ७०० च्या आसपास कॅन्सरचे रुग्ण नोंदविले जात आहेत. त्यातील जवळपास २०० लोकांना म्हणजे २७ टक्के लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतोय. विशेष म्हणजे, अशा केसेसमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण ७० टक्के इतके अधिक आहे. कारण, यात एकतर जबड्याची किंवा जिभेची शस्त्रक्रिया होत असल्याने आहारावर विपरित परिणाम होतो. रुग्ण अशक्त बनतो. शिवाय, शस्त्रक्रियेनंतरच्या रेडिएशन, किमोथेरपीसारखे उपचार अनेक जण सहनही करू शकत नाही, अशी माहिती यवतमाळ येथील ज्योती कॅन्सर रिलिफ सेंटरचे सतीश मुस्कंदे यांनी दिली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcancerकर्करोग