शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
6
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
8
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
9
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
10
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
11
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
12
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
13
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
14
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
15
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
16
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
17
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
18
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने वर्षभरात बाटविले 50 हजार नागरिकांचे जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 05:00 IST

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देमंगळवारी २५ मृत्यू : एक हजार बाधित, ॲक्टिव्ह रुग्ण ७ हजारांवर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायमच आहे. त्यातच मंगळवारी कोरोनामुळे आणखी २५ जणांचा जीव गेला. तर जिल्ह्यात एक हजार नागरिकांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजारांच्या पार गेला आहे. तर जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही सात हजारांच्यावर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ११८२ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील ६४, ६५, ७२, ७५ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ५३ वर्षीय पुरुष, नेर येथील ७७ वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ४०  व ६० वर्षीय पुरुष, केळापूर येथील ४५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, कळंब येथील ६० व ७५ वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील ७७ वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील ६०वर्षीय  पुरुष, दारव्हा तालुक्यातील ७८ वर्षीय  पुरुष, आर्णी तालुक्यातील ४५ वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील ५० वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ६७ वर्षीय  पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय  महिला आणि वर्धा येथील ६४ वर्षीय  महिलेचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६९ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील  ५२ व ६६ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ७३ वर्षीय पुरुष, वणी येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मंगळवारी पाॅझिटिव्ह आलेल्या एक हजार जणांमध्ये ५९३ पुरुष तर ४०७ महिला आहे. यात यवतमाळ येथील ३०१, मारेगाव ११०, घाटंजी १०६, पांढरकवडा ८०, दिग्रस ७०, पुसद ६६, वणी ५३, नेर ४९, बाभूळगाव ४२, आर्णी ३३, झरी ३०, कळंब २२, महागाव ११, दारव्हा १०, उमरखेड ९, राळेगाव २ तर अन्य शहरातील सहा रुग्णांचा समावेश आहे. तीन लाख ९३ हजार ८१८ अहवाल आले असून ६०२९ अप्राप्त आहे.  तीन लाख ४३ हजार ६८६ नमुने निगेटिव्ह आले.  

४१ हजार ७९२ रुग्ण झाले कोरोनामुक्त  जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी पाच हजार ६०८ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ४६०८ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सात हजार १५८ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. त्यातील दोन हजार ६९० जण रुग्णालयात भरती आहे. तर चार हजार ४६८ रुग्ण गृहविलगीकरणात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांचा आकडा ५० हजार १३२ झाला. मंगळवारी ५२० जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४१ हजार ७९२ झाली आहे.  

 मंगळवारी २० जणांचा मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला.चार मृत्यू खासगी रुग्णालयात तर एक मृत्यू डीसीएचसीमध्ये झाला.  जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी तर १२.५४ तर मृत्यू दर २.३६ आहे.