अंतरगाव आश्रम शाळेतील शौचालयाचे बांधकाम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:40 IST2021-03-06T04:40:27+5:302021-03-06T04:40:27+5:30
डोंगरखर्डा : कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील शौचालयाचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यवतमाळ जिल्ह्याबाहेरील कंत्राटदाराला हे ...

अंतरगाव आश्रम शाळेतील शौचालयाचे बांधकाम रखडले
डोंगरखर्डा : कळंब तालुक्याच्या अंतरगाव येथील शासकीय आश्रमशाळेतील शौचालयाचे बांधकाम मागील अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यवतमाळ जिल्ह्याबाहेरील कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे.
या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांकरिता स्नानगृह आणि शौचालयाकरिता दोन वर्षांपूर्वी निधी आला होता. जिल्ह्याबाहेरील कंत्राटदाराने या कामाला सुरुवातही केली. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्याने काम अर्धवट सोडून दिले. या कामांवर १९ लाख इतका खर्च अपेक्षित होता. सध्या शाळा सुरू नसल्याने अडचण नाही. मात्र, त्या आधी काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. संबंधित यंत्रणाही या कामाविषयी सुस्त असल्याचे दिसून येते. हा विषय गांभीर्याने घेऊन बांधकाम तातडीने पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.