शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडे सूचकच नाही

By admin | Updated: July 16, 2014 00:28 IST

यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचा कांगावा केला जात आहे. मुळात काँग्रेसला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक व सूचक मिळाला नाही.

यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचा कांगावा केला जात आहे. मुळात काँग्रेसला नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल करण्यासाठी अनुमोदक व सूचक मिळाला नाही. त्यामुळे अगतिक झालेल्या काँग्रेसकडून अशी प्रतिक्रिया दिली जात आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया यांनी पत्रपरिषदेत सांगितले.नगरपरिषदेत शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी सुभाष राय यांचे नाव निश्चित करण्यात आले. बाळासाहेब चौधरी व त्यांच्या समर्थनार्थ असलेल्या सात नगरसेवकांनी सुरुवातीलाच सुभाष राय यांना पाठिंबा दिला. या उलट काँग्रेसच्या महिला नगरसेविकेने अध्यक्षपदासाठी आघाडीतील काही नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादीने भाजप, बसपा नगरसेवकांची शहर विकास आघाडी तयार केली होती. आघाडीत ठरल्याप्रमाणे एक वर्ष भाजपचा नगराध्यक्ष त्यानंतर राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष व पुढील अडीच वर्षही अशीच विभागून घेण्याचे ठरले होते. मात्र भाजपच्या नगराध्यक्षाने शब्द पाळला नाही. त्यामुळे आता अडीच वर्षासाठी राष्ट्रवादीचाच नगराध्यक्ष राहणार आहे, असे आमदार संदीप बाजोरिया यांनी सांगितले. नगराध्यक्षासाठी ९ जुलै आणि त्यानंतर ११ जुलै रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होत असल्याचे सांगितले. त्यावर कुठलीही काळजी करू नका, एवढेच फक्त माणिकराव ठाकरे यांनी सांगितले आणि दुसरीकडे काँग्रेस नगरसेवकाला अध्यक्ष बनविण्याची हालचाल सुरू केली. मुळात काँग्रेसने राष्ट्रवादीविरोधातच नेहमी भूमिका घेतली आहे. अविश्वास प्रकरणात काँग्रेसने योगेश गढियाला साथ दिली होती. नगराध्यक्ष निवडणुकीसाठीही काँग्रेस नगरसेवक अमन निर्बाण यांनी दोन उमेदवारी अर्ज घेतले होते. मात्र अनुमोदक सूचकच नसल्याने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुभाष राय, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, बाळासाहेब चौधरी, स्वीकृत नगरसेवक सुमीत बाजोरिया, देवीदास अराठे, अमोल देशमुख, दत्ता कुळकर्णी, अरुणा गावंडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नरेश ठाकूर, सुरेश चिंचोळकर आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)