शेतकऱ्यांना रबी हंगामाची चिंता
By Admin | Updated: October 14, 2014 23:24 IST2014-10-14T23:24:09+5:302014-10-14T23:24:09+5:30
अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा

शेतकऱ्यांना रबी हंगामाची चिंता
यवतमाळ : अत्यल्प पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांंना चिंता लागली आहे ती रबी हंगामाची. जवळ एक दमडीही नसल्याने रबीसाठी मशागत आणि बी-बियाण्यांचा खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसाने दडी मारली. त्यामुळे कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिके उद्ध्वस्त झाली. सोयाबीनमध्ये तर शेतकऱ्यांची चक्क जनावरे सोडली. कपाशीलाही चार ते पाच बोंडे आहे. या दोनही नगदी पिकातून शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरणार नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना रबी हंगामाकडून आशा आहे. मात्र मशागत आणि बी-बियाण्यांसाठी शेतकऱ्यांजवळ पैसेच नाही. याशिवाय हरभऱ्याचे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बियाणे खरोखरच योग्य दर्जाचे आहे का यावरही संशय आहे. सोयाबीनच्या बोगस बियाण्यांमुळे शेंगा भरल्याच नाही. यासाठी पाण्याची उघाड कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा बियाण्यातील दोष असल्याचे सांगितले जात आहे. याचीच पुनरावृत्ती हरभरा आणि गहू बियाण्यातून होण्याची शक्यता आहे. (शहर वार्ताहर)