१३ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण

By Admin | Updated: December 27, 2014 02:34 IST2014-12-27T02:34:58+5:302014-12-27T02:34:58+5:30

विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पुसद वन विभागात २०१०-११ मध्ये तब्बल १३ कोटींची कामे करण्यात आली.

Complete inquiry of 13 crore scam | १३ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण

१३ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी पूर्ण

सतीश येटरे यवतमाळ
विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पुसद वन विभागात २०१०-११ मध्ये तब्बल १३ कोटींची कामे करण्यात आली. ही कामे कागदोपत्री झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी चौकशीचे आदेश दिले होते. या घोटाळ््याची चौकशी पूर्ण झाली असून, अहवालही प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे सादर करण्यात आला. आता या अहवालात ठेवलेल्या ठपक्यांची अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून छाननी केली जात आहे. कारवाईच्या भीतीने तत्कालिन डीएफओ व संबंधित वनाधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.
मृद व जलसंधारणासाठी शासनाने २०१०-११ मध्ये जिल्ह्याला कोट्यवधीचा निधी दिला. विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत एकट्या पुसद वन विभागात १३ कोटींची विकास कामे झाली. ही कामे कागदोपत्रीच झाली असून, वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने हा निधी लाटला. तसेच धनादेशाव्दारे खर्चाची रक्कम प्रदान न करता प्रत्यक्षात रोखीव्दारे देण्यात आली. त्यातही मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. याची गंभीर दखल घेत प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी घोटाळ््याच्या चौकशी करण्याचे आदेश यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक व्ही.व्ही. गुरमे यांना दिले. त्यांनी ही चौकशी यवतमाळ उपवनसंरक्षक कार्यालयाच्या दक्षता पथकाच्या वनाधिकाऱ्यांकडे सोपविली. त्यांनी चौकशी करून अहवाल तयार केला. हा अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे सादर करण्यात आला.
अर्थात या चौकशीत घोटाळ््यात सहभागी वनाधिकाऱ्यांना काही प्रमाणात झुकते माप देण्यात आल्याच्या वावड्याही उठत आहे. असे असताना नेमके अहवालात काय दडले आहे. याची उत्सुकता लोकप्रतिनिधी आणि वनविभागालाही आहे. पुसद वनविभागाचे तत्कालिन उपवनसंरक्षक जी.एस. बल्की यांच्या काळात हा घोटाळा झाला आहे. त्यांच्यासह काही वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावेही या प्रकरणात घेतली जात आहे. त्यामुळे लवकरच छाननी होऊन सत्य बाहेर पडणार असल्याने अनेकांनी धास्ती घेतली.

Web Title: Complete inquiry of 13 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.