खापरी येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 21:25 IST2019-08-15T21:24:41+5:302019-08-15T21:25:56+5:30
घाटंजी शहरालगतच्या खापरी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज उलटा फडकवून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

खापरी येथे राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
यवतमाळ- घाटंजी शहरालगतच्या खापरी येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रध्वज उलटा फडकवून अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच शंकर काकडे यांच्या हस्ते सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहन करण्यात आले. पण तिरंगा ध्वज उलटा फडकविण्यात आला. ही बाब लोकांच्या लक्षात येताच सरपंच काकडे यांनी लगेच झेंडा उतरवून पुन्हा सरळ करून फडकाविला.
याची तक्रार ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल खांडरे यांनी घाटंजी पोलीस स्टेशन येथे नोंदविली. ठाणेदार दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सुखदेव चौहान यानी सरपंच शंकर काकडे यांचे विरोधात राष्ट्रीय गौरव अपमान निवारण अधिनियम 1971च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतला आहे .