शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत कापूस वाहनांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST

बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनात भरून कापूस विक्रीस आणला. १२५ वाहने बाजार समितीच्या प्रांगणात उभी आहे. मात्र तीन दिवसांपासून कापूस खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यां​​​​​​​ना दररोज दीड-दोन हजार रुपये खर्च करावा लागत आहे. वाहनभाडे देणेसुद्धा अवघड झाले आहे.

महागाव तालुका : तीन दिवसांपासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांडलोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात कापूस भरलेल्या वाहनांची रांग लागली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तब्बल १२५ वाहने कापूस खरेदीच्या प्रतीक्षेत आहे. शेतकऱ्यांना नाईलाजास्तव तीन दिवसांपासून मुक्काम ठोकावा लागला आहे.येथील बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. त्यानंतर खरेदी सुरू करण्याची ग्वाही देण्यात आली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांनी मिळेल त्या वाहनात भरून कापूस विक्रीस आणला. १२५ वाहने बाजार समितीच्या प्रांगणात उभी आहे. मात्र तीन दिवसांपासून कापूस खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना दररोज दीड-दोन हजार रुपये खर्च करावा लागत आहे. वाहनभाडे देणेसुद्धा अवघड झाले आहे.सध्या बाजार समिती केवळ बैलगाडीतील कापूस खरेदी करीत आहे. दुसरीकडे तोंड बघून काही वाहने आत सोडली जात आहे. बाजार समिती संचालक व अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने शेतकºयांची हेळसांड होत आहे. यंदा तालुक्यात तब्बल २२ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याने बºयापैकी उत्पादन झाले. मात्र बाजार समितीकडून नियमितपणे कापूस खरेदी होत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहे. बाजार समिती सध्या गोदाम बांधकाम आणि धरम काटा उभारणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, सोमवारी दुपारपासून कापूस खरेदी सुरू करण्यात आल्याचे बाजार समितीतर्फे सांगण्यात आले.माहितीच मिळत नाहीतालुक्यातील पिंपळगाव येथील हेमंत रामराव राठोड यांनी गेल्या तीन दिवसांपासून कापूस विक्रीस आणला आहे. त्यांचे वाहन ठिय्या मांडून आहे. मात्र कापूस खरेदी केला जात नाही. बाजार समितीकडून व्यवस्थित माहिती दिली जात नाही, असा आरोप हेमंत राठोड यांनी केला.

टॅग्स :Farmerशेतकरी