शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

यवतमाळ शहरातील कचरा तुंबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 5:00 AM

या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अ‍ॅपे, वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देकामगारांचे कामबंद : तीन महिन्यांपासून वेतन अडकले, कुटुंबांवर उपासमार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील स्वच्छतेचे कामकाज करणाऱ्या कामगारांना गत तीन महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. यामुणे कामगारांनी शुक्रवारपासून कामबंद आदांलनाचे हत्यार उपसले. यातून शहरात कचरा तुंबला आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.यवतमाळ नगरपरिषदेच्या हद्दीत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामाचे कंत्राट लातूर येथील संस्थेला देण्यात आले आहे. ही संस्था कामगारांचे वेतन देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा कामागारांचा आरोप आहे. कामगारांना मे महिन्यापासून संस्थेने वेतन दिले नाही. त्यामुळे १२० कामगारांचे वेतन रखडले आहे. कंत्राटदाराने आज, उद्या वेतन देतो असे सांगत आजपर्यंत वेळ ढकलत नेली. त्यामुळे आता कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.या कामगारांच्या वेतनातून दरमहा भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही कापला जातो. मात्र संस्था हा हप्ता संबंधित शासकीय यंत्रणेडके जमा करीत नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागते. यासंदर्भात शुक्रवारी घंटागाडी, अ‍ॅपे, वाहन चालक वेलफेअर असोसिएशनच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी कामगारांनी वेतन मिळेपर्यंत आंदोलन कायम राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. यामुळे शहरात शुक्रवारी कचरा संकलन करणारे वाहन फिरले नाही. सर्व वाहने दिवसभर आझाद मैदानात उभी होती. कामगारांनी कंत्राटदार कंपनीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कमलेश गेडाम, मोहन भगत, बादल पेटकर , विजय धुळे, शैलेश खंदारे, मनोज कबाडे, मंगेश भारती, जमीर खान यांच्यासह कामगारांनी विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकाºयांना सादर केले. तत्काळ वेतन अदा करण्याची मागणी लावून धरली. हा तिढा न सुटल्याने आता शहरात कचरा तुंबणार आहे.मुख्याधिकाऱ्यांसमोर मांडल्या व्यथाकामगारांनी मुख्याधिकाऱ्यांसमोर विविध समस्या कथन केल्या. भविष्यनिर्वाह निधीची रक्कम कपात करूनही ती शासनाकडे भरली जात नाही. यामुळे कामगारांना आर्थिक फटका सोसावा लागतो. यासाठी कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप कामगारांनी केला. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी कामगारांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्याची ग्वाही दिली. मात्र तरीही कामगारांनी कामबंद आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. यामुळे शहरातील स्वच्छतेचा आता बोजवारा उडणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न