शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
2
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
3
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
4
‘टीईटी’चा पेपर ३ लाखांत, शिक्षकांची टोळीच जेरबंद; कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा
5
बिना ड्रायव्हरच्या कारपेक्षा त्याची टेक्नॉलॉजी भारतासाठी महत्त्वाची; इस्रायली उद्योगपतींशी चर्चा
6
पाक खोटे बोलतोय...फ्रान्सने केला पर्दाफाश; जगाकडूनही खावी लागली चपराक, काय केला खोटा दावा?
7
कमळावर जाे उभा त्याला मतदान करा; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वबळाचे संकेत?
8
मुंबईत तब्बल ११ लाख दुबार नावे आढळली; मतदार याद्यांमध्ये प्रचंड घाेळ, BMC कडे तक्रारींचा पाऊस
9
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
10
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
11
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
12
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
13
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
14
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
15
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
16
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
17
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
18
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
19
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
20
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘चिंतामणी’चे विद्यमान विश्वत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:15 IST

श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली.

ठळक मुद्देअस्थिरता संपुष्टात : अखेर बदल अर्ज मंजूर, सहायक धर्मदाय आयुक्तांचा निर्णय

गजानन अक्कलवार।लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : श्री चिंतामणी देवस्थान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत चेंज रिपोर्ट (बदल अर्ज) मंजुर करु नये, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका खारीज करुन चेंज रिपोर्टला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गत अनेक महिन्यापासून विश्वतांच्या निवडीबाबात निर्माण झालेली अस्थिरता अखेर संपुष्टात आली आहे.सहायक धर्मदाय आयुक्त पी.पी.चव्हाण यांनी ६ आॅगस्ट २०१६ रोजी चिंतामणी देवस्थान विश्वस्तांची निवड केली होती. दरम्यान विश्वस्तांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. परंतु ही याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. त्यानंतर चेंज रिपोर्ट मंजुर करु नये, यासाठी देवस्थानचे माजी अध्यक्ष देविदास काळे, प्रा.उमेश क्षीरसागर, चिंतामण शेंडे, रमाकांत खसाळे, अनंत भिसे व राजेंद्र कठाळे यांनी आव्हान दिले. सहायक धर्मदाय आयुक्त जे.एम.चौहाण यांच्या कोर्टात सदर प्रकरण सुरु होते. त्यामुळे चेंज रिपोर्टचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु या प्रकरणातही विद्यामान विश्वस्तांच्या बाजुने निकाल लागला. त्यामुळे विश्वस्तांच्या निवडीवर घेण्यात आलेले सर्व आक्षेप फेटाळून लावण्यात आले. देवस्थानच्यावतीने अ‍ॅड.उमेश बावणकर तर आक्षेप घेणाºया गटाची बाजू अँड.राजेश कदम व अँड पोहरे यांनी बाजू मांडली.मागील अनेक वर्षापर्यंत येथील विश्वस्त निवडीचा विषय न्यायालयीन प्रक्रियेत अडकला होता. त्यामुळे देवस्थान प्रशासनाला ठोस विकासात्मक कामांना गती देता आली नाही. भाविकांच्या सुविधेकडेही दुर्लक्ष झाले. परंतु आता नवनियुक्त विश्वस्त मंडळ पूर्ण अधिकारारुढ झाल्याने विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.उच्च न्यायालयानेही फेटाळली होती याचिकातत्पूर्वी नवीन विश्वस्तांच्या निवडीनंतर लगेच आक्षेप नोंदवून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यात धर्मदाय आयुक्तांनी विश्वस्तांची निवडप्रक्रिया चुकीच्या पध्दतीने राबविली. ओळखीतील लोकांनाच विश्वस्त म्हणून स्थान दिले. त्यामुळे ही निवड प्रक्रियाच रद्द करुन दोषींवर कारवाई करावी असा आक्षेप होता. माजी उपसरपंच विनोद काळे, भाजपाचे जिल्हा सचिव सुरेश महाजन, भाजप व्यापारी आघाडीचे प्र्रमुख विजय नवाडे, भाजपाचे माजी तालुका सरचिटणीस सुरेश होरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष अशोक गारगाटे यांनी ही याचिका दाखल केली होती. परंतु उच्च न्यायालयानेही विश्वतांच्या बाजूने निकाल दिला होता.