शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय शाळांचे हरविले बालपण

By admin | Updated: November 13, 2014 23:08 IST

एकेकाळी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी आणि बुद्धीमान विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांना अवकळा आली. शासकीय योजनांची प्रयोगशाळा झालेल्या या शाळांचेच बालपण

यवतमाळ : एकेकाळी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे धनी आणि बुद्धीमान विद्यार्थी घडविणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांना अवकळा आली. शासकीय योजनांची प्रयोगशाळा झालेल्या या शाळांचेच बालपण जणू हरविले आहे. विद्यार्थ्यांचा किलबिलाट आणि कडक शिस्तीचे शिक्षकही आता दिसत नाही. २५-३० वर्षापूर्वी ग्रामीण भागात शिक्षण म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा आणि शहरात नगरपरिषदेची शाळा असेच समीकरण होते. कितीही श्रीमंत असो की गरीब असो. सर्वांचीच मुले एकाच शाळेत शिकायची. याच शाळांनी उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नागरिक घडविले. मोठ्या पदावर असलेल्या अनेकांना आजही आपल्या प्राथमिक शाळेचा अभिमान आहे. मात्र अलिकडच्या काळात शासकीय धोरणात जिल्हा परिषद आणि प्राथमिक शाळांची अवस्था वाईट होत चालली आहे. केवळ गरिबांची शाळा अशी बिरुदावली या शाळांना लावली जात आहे. गावाकडील टुमदार कौलारु शाळा शष्टकोणी झाल्या. परंतु या शाळांमध्ये खिचडीचा भटार खाना आला. गुरुजीही गावाऐवजी शहराकडे धाव घेऊ लागले. शाळांची पटसंख्या घसरायला लागली. मोफत पुस्तके, मोफत गणवेश, मध्यान्ह भोजन अशा सुविधा असतानाही जिल्हा परिषद किंवा नगरपरिषद शाळेत शिकलेले पालकच आता या शाळांना नाक मुरुड लागली आहे. सर्वांचा धावा आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे दिसत आहे. बालमनांना आकार देणाऱ्या आणि त्यांच्या उज्वल भविष्याच्या साक्षीदार असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपरिषद शाळा आता केवळ गोरगरिबांच्या मुलांसाठीच आहे काय अशी स्थिती निर्माण झाली. या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर या शाळांचे बालपण हरवून गेल्याशिवाय राहणार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)