शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

बालमजूर कायदा केवळ कागदावरच

By admin | Updated: May 27, 2015 02:11 IST

१४ वर्षाखालील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे.

यवतमाळ : १४ वर्षाखालील मुलांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र असे असले तरी अद्यापही शेकडो मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येतात. जिल्ह्यातील अनेक चिमुकले विविध ठिकाणी राबताना दिसतात. अनेक मुले धोकादायक कामावर आई-वडिलांसह काम करताना दिसतात. नियमांचे उल्लंघन होत असून संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे बालमजूर कायदा हा केवळ कागदावरच असल्याचे दिसून येते.१४ वर्षा पेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात अथवा इतर ठिकाणी कामाला ठेवणे, त्यांच्याकडून कामे करून घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु शहरात सर्रास बालकामगारांकडून लहान मोठी कामे करून घेतल्याचे दिसून येते. प्रशासनासमोर लहान मुले काम करताना दिसत असतानासुद्धा कोणतीही कारवाई केली जात नाही. जिल्ह्यातील हॉटेल्स्, चहा टपऱ्या, कापड दुकान, किराणा दुकान, रसवंती, पाणीपुरी स्टॉल, थंडपेयाची दुकाने इतकेच नव्हे तर विटभट्ट्या व इतर जोखीमीच्या ठिकाणी बालमजूर राबताना आढळतात. गारा तुडविणे, ओल्या विटा डोक्यावर वाहून नेणे आदी मेहनतीची कामे बालमजुरांकडून करून घेतल्या जाते. परंतु याबाबत कधीही धाडसत्र राबवून प्रशासनाकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जात नाही. बालवयात मुलांच्या मनावर विविध धोकादायक कामांमुळे विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. जी कामे मुलांना पेलणार नाही, अशी कामेसुद्धा त्यांच्याकडून करवून घेतली जातात. मुलांना कामावर राबविणे गुन्हा असल्याचे माहीत असतानासुद्धा काही व्यापारी वर्ग पैसे वाचविण्याच्या नादात लहान मुलांना कामावर ठेवतात. (कार्यालय प्रतिनिधी)