लुटारूंचा दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:10 IST2018-03-15T18:10:06+5:302018-03-15T18:10:06+5:30
वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन लुटारूंना अटक केली.

लुटारूंचा दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला, दोघांना अटक
यवतमाळ : वाटमारी करणा-या लुटारूंनी दोन पोलीस अधिका-यांवर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना केळापूर टोल नाक्यावर गुरुवारी पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन दिवसांपासून या ठिकाणी सापळा लावला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावत जळगाव जिल्ह्यातील दोन लुटारूंना अटक केली.
पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर आणि पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे असे जखमी पोलीस
अधिका-यांची नावे आहेत. नागपूर-हैदाराबाद राष्ट्रीय महामार्गावर रविवारी एका ट्रक चालकाला चाकूच्या धाकावर लुटण्यात आले होते. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी या परिसरात दोन दिवसांपासून सापळा रचला होता. गुरुवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास केळापूर नाक्याजवळ काही अनोळखी इसम ट्रकजवळ आले. तेवढ्यात सापळा रचलेल्या अधिकारी व कर्मचाºयांनी धाव घेतली. त्यावेळी या लुटारूंनी त्यांच्यावर प्रचंड दगडफेक केली. याही परिस्थितीत पोलिसांनी लुटारूंना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पीएसआय मंगेश भोंगाडे यांच्यावर लुटारूंनी चाकूहल्ला केला. तर दगडफेकीत एपीआय आनंद पिदूरकर जखमी झाले. या झटापटीतही पोलिसांनी लुटारू दिलीप पवार (१९) आणि शामपाल रामला पवार (२१) दोघे रा. मादापुरी ता. मुक्ताईनगर जि. जळगाव यांना अटक केली. तर दोन आरोपी घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाले. या आरोपींवर जळगाव जिल्ह्यात खून, दरोडा असे गंभीर गुन्हे आहेत. रुद्राक्ष व स्फटीकाच्या माळा विकण्याचा व्यवसाय करून रात्री वाटमारी करीत असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी सांगितले.