शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा हेराफेरीप्रकरणी तीन दिवसांनंतर गुन्हा दाखल; कोळशाच्या धंद्यात कुणाचे हात काळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 12:23 IST

Yavatmal : उकणी कोळसा खाणीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा रेल्वे साइडिंगवर न नेता या कोळशाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. त्या जागी माती व गिट्टी भरून ते साइडिंगवर आणण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी (यवतमाळ) : उकणी कोळसा खाणीतून निघालेला उच्च दर्जाचा कोळसा रेल्वे साइडिंगवर न नेता या कोळशाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली. त्या जागी माती व गिट्टी भरून ते साइडिंगवर आणण्यात आले. या गंभीरप्रकरणी वणी पोलिसांनी अखेर तीन दिवसांनंतर केवळ दोन ट्रक चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोळशाच्या या काळ्या धंद्यात कुणा-कुणाचे हात काळे झाले आहेत, याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या हेराफेरीत अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

२२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास हा कोळसा हेराफेरीचा प्रकार घडला. तो उजेडात आल्यानंतर याप्रकरणी कोलारपिपरी सबएरियाचे उपक्षेत्रीय प्रबंधक युसूफ एम. हुसेन यांच्यातर्फे रेल्वे साइडिंग इन्जार्ज देवेंद्र प्रतापसिंग परिहार यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी ट्रकचालक सैफ अली व विश्वनाथ या दोघांविरुद्ध बीएनएसच्या ३१६ (३), ३१८ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही आरोपी ट्रक चालक फरार आहेत. तक्रारीनुसार २२ फेब्रुवारीच्या सायंकाळी ४:२० वाजेच्या सुमारास वणी तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत मे. कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या खासगी कंपनीचे दोन ट्रक (क्र. सीजी ११ बीएम ९०३३, सीजी १५ ईएच ३२७४) पोहोचले. या कंपनीला कंत्राट दिले आहे. हा कोळसा वीज वितरण कंपनीला पाठविला जातो. त्यानुसार या दोन्ही ट्रकमध्ये कोळसा भरून सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वणी रेल्वे साइडिंगकडे निघाले. ८ वाजता हे ट्रक रेल्वे साइडिंगजवळील टोल नाक्यावर पोहोचले. टोल नाक्यावरून साइडिंगचे अंतर केवळ ५ मिनिटांचे आहे.

मात्र, हे ट्रक रात्री ९:३० वाजता साइडिंगवरील काट्यावर पोहोचले. काटा झाल्यानंतर ट्रकमधील कोळसा रिकामा करताना त्यामध्ये माती व गिट्टी भरून असल्याची बाब कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. येथूनच या हेराफेरीचे बिंग फुटले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोळशाची तांत्रिक तपासणी केल्यानंतर वणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

कोळशाची खेप नेमकी उतरली कुठे ?

  • टोल नाक्यावरून निघालेले हे ट्रक लालपुलिया परिसरातील एका धरमकाट्याच्या मागे असलेल्या प्लॉटवर पोहोचले.
  • तेथे ट्रकमधील उच्च प्रतीचा कोळसा उतरविण्यात आला व कळमना मार्गावरील एका कोळसा प्लॉटवरून माती व गिट्टीमिश्रित निकृष्ट दर्जाचा कोळसा ट्रकमध्ये भरून तो साइडिंगवर आणण्यात आला, अशी चर्चा कोळसा व्यावसायिकांमध्ये आहे.
  • यात काही राजकीय व्यक्ती गुंतले असल्याचेही बोलले जात आहे. या गोरखधंद्याची पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेपुढे उभे आहे.
English
हिंदी सारांश
Web Title : Coal Scam: FIR Filed After Three Days; Who's Involved?

Web Summary : High-grade coal was replaced with soil and gravel. Police filed a case against two truck drivers. The coal scam investigation has begun, with potential involvement of influential figures.
टॅग्स :Coal Allocation Scamकोळसा खाण घोटाळाYavatmalयवतमाळ