शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मृत अभियंत्याची पत्नी असल्याचे सांगणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल; वणीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 15:09 IST

नोकरी व पैशावर केला होता दावा

वणी (यवतमाळ) : मृत झालेल्या एका अविवाहित अभियंत्याची पत्नी असल्याची बतावणी करून अनुकंपावरील नोकरी आणि पैशावर दावा करणाऱ्या तोतया महिलेचे बिंग फुटले आहे. खोटे प्रमाणपत्र सादर करून पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या या महिलेविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात भादंवि १९९, २०१, ४२०, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. मृत अभियंत्याची आई शकुंतला मधुकर कोनप्रतीवार हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

रशिदा बेगम सय्यद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर, असे तोतया महिलेचे नाव आहे. चंद्रशेखर मधुकर कोनप्रतीवार असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तो मूळचा वणी येथील रहिवासी असून, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात शाखा अभियंता म्हणून कार्यरत होता. या दरम्यान, २० जानेवारी २०२२ला त्याचे हृदयविकाराने निधन झाले. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी वारसाला मिळणाऱ्या कायदेशीर लाभासाठी न्यायालयात वारसा प्रमाणपत्राकरिता अर्ज केला. मात्र, त्याचवेळी या प्रकरणात रशिदा बेगम सय्यद फकरुद्दीन उर्फ सुप्रिया रंगनाथ रुईकर या महिलेने उडी घेतली.

चंद्रशेखरच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या वारसा प्रमाणपत्रावर रशिदाने आक्षेप घेतला. सध्या ही महिला नागपुरात वास्तव्याला आहे. तत्पूर्वी ती वणी येथे वास्तव्याला होती. सन २००७ मध्ये नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात चंद्रशेखर सोबत लग्न झाले. त्यानंतर चंद्रशेखरपासून दोन मुले झालीत, असा दावा तिने आक्षेप घेताना केला. चंद्रशेखरच्या मृत्यूनंतर नोकरी व इतर आर्थिक लाभावर तिने दावा केला. यासाठी ती न्यायालयात गेली.

असे फुटले महिलेचे बिंगचंद्रशेखरच्या कुटुंबीयांच्या माहितीप्रमाणे, ही महिला ही वणीतील रंगारीपुरा येथे एका इसमासोबत २०२० पर्यंत राहत होती. त्या इसमापासून तिला दोन मुले झालीत. या मुलांची डिलिव्हरी वणीतीलच एका खासगी रुग्णालयात झाली. याची नोंद चिखलगाव ग्रामपंचायतीमध्ये होती. ही नोंद चंद्रशेखरच्या कुटुंबीयांनी पुरावा म्हणून सादर केला. शिवाय गणेश टेकडी मंदिर येथे कोणत्याही प्रकारचे लग्न होत नाही व आजपर्यंत कोणतेही लग्न येथे झाले नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. तसेच ज्या तारखेला लग्न झाल्याचा दावा करण्यात आला, त्या तारखेला चंद्रशेखर हा कर्तव्यावर हजर होता. असे विविध पुरावे त्याच्या कुटुंबीयांनी सादर केल्याने तोतया पत्नीचे बिंग फुटले. महिलेचे बिंग फुटताच न्यायालयाने चंद्रशेखरच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. तसेच तोतया पत्नीवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून वणी पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी