ट्रकची कारला धडक, एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:08 IST2018-04-10T23:08:24+5:302018-04-10T23:08:24+5:30
भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील हिवरीजवळील मनदेव तलावानजीक सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.

ट्रकची कारला धडक, एक ठार
हिवरी : भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील हिवरीजवळील मनदेव तलावानजीक सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
संतोष साहेबराव देमगुंडे (४०) रा. वाघापूर रोड यवतमाळ असे मृताचे नाव आहे. त्यांचे रुईवाई येथे शेत आहे. या शेतात ते कारने (एम.एच.३१-एच-३८३९) ने जात होते. मनदेव तलावानजीक आर्णीकडून येणाºया भरधाव ट्रकने कारला जबर धडक दिली. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. त्यात संतोष देमगुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.