शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

भीतीच्या पिंजऱ्यातून शाळेच्या नभात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 5:00 AM

ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा नव्या उल्हासाने सुरू करण्यात आले. कोरोनाची भीती पालकांच्या मनात असली तरी मुला-मुलींच्या मनात मात्र शाळेत जाण्याची ओढ जास्त जाणवली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत अपेक्षित उपस्थिती पाहायला मिळाली. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनोन्‌महिने पिंजऱ्यात कोंडलेल्या पाखरांना सोमवारी मुक्त आकाशात भरारी घेण्याची संधी मिळाली. दीड वर्ष कोरोनाच्या भीतीपायी घरातच दडून बसलेल्या चिमुकल्यांना अखेर शाळेच्या आवारात सवंगड्यांसोबत शिकण्यासोबतच दंगामस्ती, हल्लागुल्ला करायला मिळाला. सोमवारपासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजल्या. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पुन्हा एकदा नव्या उल्हासाने सुरू करण्यात आले. कोरोनाची भीती पालकांच्या मनात असली तरी मुला-मुलींच्या मनात मात्र शाळेत जाण्याची ओढ जास्त जाणवली. त्यामुळेच पहिल्याच दिवशी प्रत्येक शाळेत अपेक्षित उपस्थिती पाहायला मिळाली. तब्बल दीड वर्ष बंद असलेले वर्ग स्वच्छ करून तेथे पुन्हा एकदा आनंददायक वातावरण निर्माण करण्याचे आवाहन प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी आवडीने स्वीकारले होते. तर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्तणुकीसंदर्भातील घातलेले नियम तंतोतंत पाळले गेले. जवळपास प्रत्येक शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे दारावरच गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर एका बाजूला मांडलेल्या टेबलपुढे प्रत्येक विद्यार्थ्यांची तापमान तपासणी करण्यात आली. त्यासाठी दोन-दोन शिक्षकांकडे जबाबदारी सोपविली गेली. ज्यांनी घरून मास्क आणले नाही, त्यांना शाळेतून मास्क पुरविण्यात आले. मास्क सोबतच जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या शाळांमध्ये नवी कोरी पाठ्यपुस्तकेही वाटप करण्यात आली. तर उत्साही असलेल्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशही शिवून आणून दिले. फुलांसह मुलांजवळ सॅनिटायझरचाही सुगंध दरवळला. 

शिक्षण विभागासह सीईओही दिवसभर शाळांच्या दौऱ्यावर  - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होणार असल्याने सोमवारी शिक्षण विभाग अलर्ट होता. जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी व दीपक चवणे, शिक्षण निरीक्षक योगेश डाफ, उपशिक्षणाधिकाऱ्यांसह सोळाही पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख अशी संपूर्ण पर्यवेक्षकीय यंत्रणा शाळा भेटी करीत दिवसभर दौऱ्यावर होती. या संपूर्ण शाळा भेटींवर सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांची नजर होती. सीईओ, शिक्षणाधिकाऱ्यांनी तुपटाकळी, तळेगाव, पांढरकवडासह दिग्रस, उमरखेडच्या शाळांना भेटी दिल्या. 

कुठे गाणी-गप्पा तर कुठे कोळी नृत्य... पुस्तकांसह सायकलही - पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. तर शाळेत पाऊल ठेवताच बच्चे कंपनीही आनंदाने हरखून गेली. पहिला दिवस असल्याने पुस्तकी अभ्यासापेक्षा गोष्टी, गाणी यातून अध्यापनाला सुरुवात झाली. एकमेकांना फूल वाटप करण्यात आले. तर सुकळीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करून पहिला दिवस साजरा केला. यवतमाळ नगरपालिकेच्या शाळांमध्ये पुस्तक वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. पांढरकवडा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकल वाटप करण्यात आल्या. 

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या