गेल्या वर्षात पेट्रोल, डिझेल किती रुपयांनी घटले? तरीही दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 18:14 IST2025-01-21T18:12:48+5:302025-01-21T18:14:22+5:30
Yavatmal : अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर राहिले स्थिर

By how much did petrol and diesel prices decrease in the last year? Still, the prices are beyond the reach of the common man!
संतोष कुंडकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : गेल्या काही वर्षात वाहनातील इंधनाचे दर चांगले वाढले आहे. मात्र वर्षभरात हे दर काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी सध्या असलेले डिझेल-पेट्रोलचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्याने इतर साहित्याचे दरदेखील वाढले आहेत. त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकाला बसत आहे. सन २०२४ ते २५ या वर्षाची आकडेवारी लक्षात घेतली, तर जानेवारी २०२४ मध्ये १०७ रुपयांवर पोहोचलेले पेट्रोलचे दर एप्रिल महिन्यात दोन रुपयांनी घटून १०५ रुपये लिटर झाले. जानेवारी २०२४ मध्ये डिझेल ९३ रुपये प्रतिलिटर होते. एप्रिलमध्ये डिझेलच्या किमतीतही दोन रुपयांची घट दिसून येते.
डिझेलमध्ये अडीच टक्के घट
जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एक वर्षातील आकडेवारी पाहता, डिझेलचे दर केवळ दोन रूपयांनी कमी झाले. ही घट केवळ २.५ टक्के आहे. जानेवारी २०२४ मध्ये ९३ रूपये प्रतिलिटरने असलेले डिझेल ९१ रुपये झाले. जीवनावश्यक वस्तूंची आयात निर्यात डिझेलच्या वाहनातूनच होते.
पेट्रोलमध्ये अडीच टक्के घट
सन जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ या एक वर्षातील आकडेवारीवरून नजर फिरविली, तर पेट्रोलचे दर केवळ दोन रुपयांनी कमी झाले. ही घट केवळ २.५ टक्के आहे.
असे घटले पेट्रोल-डिझेलचे दर
तारीख पेट्रोलचे दर डिझेलचे दर
१ जानेवारी २०२४ १०७ ९३
१ फेब्रुवारी १०७ ९३
१ मार्च १०७ ९३
१ एप्रिल १०५ ९१
१ मे १०५ ९१
१ जून १०५ ९१
१ जुलै १०५ ९१
१ ऑगस्ट १०५ ९१
१ सप्टेंबर १०४ ९१
१ ऑक्टोबर १०४ ९१
१ नोव्हेंबर १०४ ९१
१ डिसेंबर १०५ ९१
१ जानेवारी २०२५ १०५ ९१
सर्वसामान्य म्हणतात....
"आज प्रत्येकाजवळ पेट्रोलवर धावणारी दुचाकी आहे. त्यामुळे पेट्रोलची मागणी वाढली आहे. वेळेच्या बचतीसाठी दुचाकीचा वापर केला जातो. मात्र पेट्रोलचे वाढलेले दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत."
- हरिषचंद्र वाढई, नागरिक
"आमच्या प्रोजेक्टवरील सर्व वाहने ही डिझेलवर चालतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेलचे दर वाढल्याने खर्चाचा भुर्दंड वाढला आहे. याचा फटका सामान्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने इंधनाच्या दराबाबत विचार करावा."
- सुनिल घाटे, नागरिक