दारव्हात कापूस खरेदी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:06+5:30
शेतमालाला हमी भाव मिळावा, याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र अर्ध्यापेक्षा जास्त शेतमाल व्यापाºयांच्या घषात गेल्यानंतरसुद्धा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. सीसीसीआय व पणन महासंघ कापूस, तर नाफेडतर्फे सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद आदी शेतपिकांची खरेदी केली जाते.

दारव्हात कापूस खरेदी सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : थोडे उशीरा का होईना, येथे अखेर सोमवारपासून शासकीय कापूस खरेदीला सुरुवात झाली. मुहूर्तालाच कापूस विक्रीसाठी गर्दी झाली होती. आवक आणखी वाढण्याची चिन्हे आहे. शासकीय केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
येथे शेतमाल खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यामुळे तत्काळ ऑनलााईन नोंदणी व कापसाची खरेदी सुरू करण्यात आली, हे विशेष. परंतु सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे कापूस खरेदीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी नाफेडचे शेतमाल खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्यामुळे धान्य खरेदीचा मुहूर्त केव्हा निघणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेतमालाला हमी भाव मिळावा, याकरिता शासकीय एजन्सीमार्फत शेतमालाची खरेदी करण्यात येते. परंतु या ठिकाणी मात्र अर्ध्यापेक्षा जास्त शेतमाल व्यापाºयांच्या घषात गेल्यानंतरसुद्धा शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. सीसीसीआय व पणन महासंघ कापूस, तर नाफेडतर्फे सोयाबीन, तूर, चना, मूग, उडीद आदी शेतपिकांची खरेदी केली जाते. शासनाने मोठा गाजावाजा करून खरेदी केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. जाहिरातींद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले. मात्र येथे नोंदणी तसेच खरेदी केंद्र सुरू झाले नव्हते. नाफेडने येथे ऑनलाईन नोंदणीसाठी निविदा काढली होती. त्यानुसार हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले. परंतु अद्याप नोंदणी सुरू झाली नाही.
सीसीआयने दोन खासगी जिनिंगमध्ये कापूस खरेदीला मंजुरी दिली. तेथेच ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु प्रत्यक्षात नोंदणी वा खरेदीला सुरुवात झाली नव्हती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच सहकार विभाग, सीसीआय तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती स्तरावर वेगाने हालचाली झाल्या आणि लगेच ऑनलाईन नोंदणी व कापूस खरेदीला सुरुवात झाली. शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
शेतकऱ्यांचा सन्मान, ‘लोकमत’चे आभार
जाधव कॉटन इंडस्ट्रीजमध्ये कापूस खरेदीच्या शुभारंभाला मान्यवरांच्या हस्ते प्रथम आलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शासकीय शेतमाल खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याचा मान्यवरांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच शेतकऱ्यांनी ‘लोकमत’चे आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, सहाय्यक निबंधक अजित डेहणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक जी.एस. कुमरे, सचिव पुरुषोत्तम चंचलकर, माजी सचिव शेषराव सावध, नगरसेवक शरद गुल्हाने, जाधव कॉटन इंडस्ट्रीजचे संचालक भाऊराव जाधव, सुभाष राठी, किरण खडसे, अमोल दहापुते, सचिन पुरी, सूरज चव्हाण, सीसीआयचे अधिकारी आदींसह शेतकरी व नागरिक उपस्थित होते.