शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा पालिकेला इशारा

By admin | Updated: March 12, 2015 02:18 IST

बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या बाजूला आर्णी नगरपरिषदेकडून बांधकाम सुरू आहे. मात्र या कामास विनाकारण विलंब होत आहे.

आर्णी : बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या बाजूला आर्णी नगरपरिषदेकडून बांधकाम सुरू आहे. मात्र या कामास विनाकारण विलंब होत आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला बांधकाम साहित्य आणून पडले आहे आणि नालीही खोदून ठेवली आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी कमालीचा त्रास होत आहे. या बाबत व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या कालावधीत नगरपरिषदेने त्वरित बांधकामाला सुरुवात न केल्यास रोडवर टाकलेल्या गिट्टी, रेतीनेच खोदलेली नाली पुन्हा बुजविण्यात येईल, असा इशारा आज व्यापाऱ्यांनी दिला आहे. तसे फलक तयार करून गिट्टीच्या ढीगावर लावण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे हा फलक सोशल मीडियावरही झळकत आहे. यावर नालीचे काम झालेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात या परिसरातील काही व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता गोलू राठी हे व्यापारी म्हणाले, मागील एक महिन्यापासून नाली खोदून ठेवली आहे. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे नालीत पाणी जमा झाले आहे. नाली रुंद असल्याने व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दुकानात ये-जा करण्यासाठी चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मच्छरांची पैदास होत असून दुर्गंधी येत आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे.या सर्व बाबींची वारंवार नगरपरिषदेला माहिती देवूनसुद्धा ते कोणताही प्रतिसाद देत नाही. आर्णीचे प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे यांना या बाबत व्यापाऱ्यांनी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेने त्वरित पाऊले न उचलल्यास नाली बुजविणार असल्याचा इशारा आर्णी परिसरातील व्यापाऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)