पहूर येथे आगीत घर भस्मसात, लाखाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:19 IST2018-05-05T22:19:58+5:302018-05-05T22:19:58+5:30

घराला अचानक आग लागण्याची घटना तालुक्यातील पहूर येथे शनिवारी दुपारी घडली. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाले.

Burn the house here in the fire, loss of lacquer | पहूर येथे आगीत घर भस्मसात, लाखाचे नुकसान

पहूर येथे आगीत घर भस्मसात, लाखाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
बाभूळगाव : घराला अचानक आग लागण्याची घटना तालुक्यातील पहूर येथे शनिवारी दुपारी घडली. या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे साहित्य भस्मसात झाले.
पहूर येथे वेणूबाई बबनराव नागरे यांचे घर आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास या घराला अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्ररूप धारण केले. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पंरतु यश आले नाही. या आगीत घरातील सोन्याचे दागिने, कपडे, अन्नधान्य, टीव्ही, फ्रिज, सागवान दरवाजा, खिडक्या, इलेक्ट्रीक सामान, मिक्स, गॅस सिलिंडर यासह इतर साहित्य भस्मसात झाले. या आगीची माहिती तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी पी.आर. कांबळे, तलाठी जी.डी. भुक्तार यांना देण्यात आली.

Web Title: Burn the house here in the fire, loss of lacquer

टॅग्स :fireआग