यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 13:10 IST2019-06-28T13:10:33+5:302019-06-28T13:10:56+5:30
शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर असलेल्या कोसदनी घाटातील पूल वाहून गेला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पूल वाहून गेला
ठळक मुद्देवाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गावर असलेल्या कोसदनी घाटातील पूल वाहून गेला आहे. या पुलाच्या ढळण्याने या महामार्गावरील मोठी वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली आहे.
जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यात असलेल्या कोसदनी घाटात असलेला हा लहानसा पूल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेला आहे. यापुलाजवळच नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र हा पूल तयार होण्यास अद्याप बराच कालावधी लागणार आहे. महामार्गावर असलेला हा पूल कोसळल्याने येथे वाहनांची गर्दी झाली असून मोठी कोंडी झाली आहे.