शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बोलेरोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2015 03:03 IST

अनियंत्रित बोलेरो जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा

यवतमाळ : अनियंत्रित बोलेरो जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना येथील दारव्हा नाक्याजवळील रेल्वे क्रॉसिंगवर रविवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. लखन सतीश अग्रवाल (२२) रा. खामगाव जि. बुलडाणा असे मृताचे नाव आहे. तर सागर अनंतराव सव्वालाखे (२५) रा. नेहरुचौक यवतमाळ असे जखमीचे नाव आहे. लखन हा व्यावसायिक शिक्षणासाठी गत पाच वर्षांपासून यवतमाळात आत्या राधा कमलकिशोर चोखाणी यांच्याकडे राहत होता. रविवारी मित्र सागर सव्वालाखे सोबत तो दुचाकीने (एम.एच.२९-एसी-५९९९) घराकडे जात होता. त्यावेळी दारव्हा नाक्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर समोरुन बोलेरो एम.एच.१५-ईपी-२८६६ ने जबर धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, दुचाकी बोलेरोच्या खाली चिरडल्या गेली. यात लखनच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तर जखमी अवस्थेत सागरला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी जितेंद्र कमलकिशोर चोखाणी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून बोलेरो जीप चालक संदीप लालसिंग रघुवंशी (३६) रा. येवदा ता. दर्यापूर जि. अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप हा एका बियाणे कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून तो यवतमाळवरून यवतमाळकडे जात होता. लखन अग्रवालचे शवविच्छेदन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह खामगाव येथे नेण्यात आला. तो खामगाव येथील अग्रवाल कोल्ड्रींगस्चे संचालक सतीश अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याच्या मागे दोन बहिणी आहे. या घटनेने यवतमाळात हळहळ व्यक्त होत आहे.