शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

वरोडीत धुऱ्याच्या वादात खून

By admin | Updated: October 22, 2014 23:24 IST

शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

शेतकऱ्यावर कुऱ्हाडीचे घाव : पाच आरोपींचे पोलिसांपुढे आत्मसमर्पणमहागाव : शेताच्या धुऱ्याच्या वादावरून एका शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील वरोडी येथे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. यातील पाच आरोपींनी महागाव पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून आरोपीत दोन भाऊ आणि चार मुलांचा समावेश आहे. आत्माराम हिरा अडकिने (४५) रा. वरोडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अडकिने नेहमीप्रमाणे शेतात ओलितासाठी बुधवारी सकाळी गेले. यावेळी शेजारील शेतकरी मस्के याच्यासोबत धुऱ्याचा वाद उफाळून आला. या वादात संभाराव आनंदराव मस्के, आनंदराव संभा मस्के, विलास संभाराव मस्के, हसन संभाराव मस्के, कुबेर संभाराव मस्के आणि सतीश आनंदराव मस्के यांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत कुऱ्हाडीचे घाव वर्मी बसल्याने आत्मारामचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनाही या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विन पाटील यांनीही घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान यातील संभाराव मस्के आणि त्यांच्या चार मुलांनी महागाव पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. अडकिने आणि मस्के यांच्यात २००८ पासून धुऱ्याचा वाद होता. या प्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. तसेच आत्माराम अडकिने यांनी प्रशासनाच्या कानीही वाद घातला होत. तसेच न्याय मिळावे म्हणून महागाव तहसीलसमोर उपोषणही केले होते. मात्र या प्रकरणी कुणीच योग्य दखल घेतली नाही. परिणामी बुधवारी याचे पर्यावसान आत्मारामच्या खुनात झाले. (शहर प्रतिनिधी)