शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

एसीसीतील स्फोटाने गोवारीला हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

नियमानुसार दुपारी १२.३० ते १.३० व ३.३० ते ४.३० या वेळात खाणीत स्फोट करणे अपेक्षित आहे. परंतु एसीसी प्रशासनातील काही मुजोर अधिकारी ब्लास्टिंगच्या वेळाच पाळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी तर चक्क रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्फोट घडविण्यात आले. त्यामुळे खाणीतील दगड गोवारी रस्त्यावर येऊन पडले. तसेच परिसरातील शेतांमध्येही मोठमोठे दगड येऊन पडल्याने पिकांची मोठी हानी झाली. यामुळे गावकरी संतापले.

ठळक मुद्देनियमांची पायमल्ली : बारूदीच्या स्फोटामुळे खाणीतील दगड रस्त्यावर, घरांना तडे

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील शिंदोला परिसरात असलेल्या एसीसी खाणीत नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर उत्खननासाठी बारूदीचे स्फोट केले जात असून, त्यामुळे या खाणीलगत असलेल्या गोवारी गावाला चांगलेच हादरे बसत आहेत. अनेक घरांना यामुळे तडे गेले आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्त्वात गावकऱ्यांनी एसीसी कंपनीत जाऊन यासंदर्भात जाब विचारला. यावेळी वणीचे तहसीलदार विवेक पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले आदी उपस्थित होते. या अधिकाऱ्यांपुढे गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. चर्चेअंती यापुढे वेळा पाळूनच खाणीत स्फोट केले जातील, असे आश्वासन कंपनीतर्फे देण्यात आले. यासोबतच काही मागण्यादेखील गावकऱ्यांनी केल्या. त्यासंदर्भातही कंपनीने सकारात्मक भूमिका घेतली. नियमानुसार दुपारी १२.३० ते १.३० व ३.३० ते ४.३० या वेळात खाणीत स्फोट करणे अपेक्षित आहे. परंतु एसीसी प्रशासनातील काही मुजोर अधिकारी ब्लास्टिंगच्या वेळाच पाळत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गुरुवारी तर चक्क रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास स्फोट घडविण्यात आले. त्यामुळे खाणीतील दगड गोवारी रस्त्यावर येऊन पडले. तसेच परिसरातील शेतांमध्येही मोठमोठे दगड येऊन पडल्याने पिकांची मोठी हानी झाली. यामुळे गावकरी संतापले. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्त्वात शुक्रवारी सकाळी याबाबत वणीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. गोवारी येथील एसीसीच्या खाणीत सततच्या ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत. या खाणीत मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात असल्याचा आरोपही एसडीओंना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Blastस्फोट