शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

रस्त्यावर फिरताना दक्ष राहा... कोरोना संकट गंभीर वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 5:00 AM

सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोनाने वेगान एन्ट्री सुरू केली. जिल्ह्यात मार्च-एप्रिलपर्यंत केवळ यवतमाळ शहर, त्यातही शहरातील विशिष्ट परिसरातच मोजके रुग्ण होते.

ठळक मुद्दे समूह संसर्गाचा धोका वाढला : काळजी न घेतल्यास जिल्हा लवकरच तिसऱ्या टप्प्यात जाण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जेव्हा कोरोना संसर्गाची गती कमी होती, तेव्हा अत्यंत कठोर लॉकडाऊन आणि आता संसर्गाची गती प्रचंड वाढलेली असताना बाजारपेठ अनलॉक, असा उलटफेर झाल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. रुग्णांची दरदिवशी वाढणारी आकडेवारी बघता खुद्द प्रशासनानेच समूह संसर्गाचा धोका वर्तविला आहे. टाळेबंदी आणि संचारबंदीत थोडीशी शिथिलता मिळताच नागरिकांनी शहरात बेसुमार गर्दी करणे सुरू केले आहे. यातून कोरोना संकट तिसºया टप्प्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. प्रशासनाचे, सामाजिक संघटनांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे सामंजस्य आणि समन्वय हेच सूत्र या संकटातून जिल्ह्याला वाचवू शकते.सुरुवातीला परदेशातून आलेले नागरिक, नंतर तबलिकीचा प्रकार यातून रुग्ण वाढत गेले. मात्र प्रशासनाने आणि डॉक्टरांनी हे संकट यशस्वीपणे थोपविले, परतविले. परंतु मे महिना सुरू होताच परठिकाणी अडकलेल्या मजुरांना जिल्ह्यात एन्ट्री सुरू झाली आणि अडखळलेल्या कोरोनाने वेगान एन्ट्री सुरू केली. जिल्ह्यात मार्च-एप्रिलपर्यंत केवळ यवतमाळ शहर, त्यातही शहरातील विशिष्ट परिसरातच मोजके रुग्ण होते. मात्र मेपासून कोरोना विषाणूने तालुके, तालुक्यातील खेडे व्यापले. आता चक्क ३७९ पर्यंत रुग्णसंख्या वाढली आहे. या दरम्यान १४ जणांना प्राणही गमवावे लागले. तर आजही शंभरावर नागरिक रुग्णालयात आणि शेकडो नागरिक विलगीकरणात, अलगीकरणात बंदिस्त आहेत.लॉकडाऊन कठोर असताना रुग्णसंख्या त्रिशतकाच्या पलिकडे गेली. आता तर नागरिकांमधील प्रारंभीचे गांभीर्य संपले आहे. शिवाय लॉकडाऊनही अनलॉक झाले आहे. विशिष्ट वेळातच खरेदीची मुभा असताना नागरिक दिवसभर, काही जण रात्री देखील फिरत आहेत.यंत्रणा उपाययोजना करीत आहे. मात्र नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाईचे अधिकार शासनाने स्थानिक पातळीवर दिले आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्स न पाळणाºयांना दंड केला जाईल. सर्व कंटेन्मेन्ट झोनची मी स्वत: पाहणी केली असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी.- एम.डी. सिंह जिल्हाधिकारी.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या