शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

पुरस्कारप्राप्त फुलसावंगी आरोग्य केंद्र वाऱ्यावर

By admin | Updated: March 1, 2016 02:03 IST

फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबणाऱ्या हाताची महिमा राज्यात उमटली. त्यांची दखल शासनाने घेतली आहे.

निधीचा अभाव : जिल्हा आरोग्य यंत्रणेचा कारभार कारणीभूत महागाव : फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबणाऱ्या हाताची महिमा राज्यात उमटली. त्यांची दखल शासनाने घेतली आहे. राज्यपालांनी गौरव केला. मात्र आता हे प्राथिमक आरोग्य केंद्र वाऱ्यावर दिसत आहे. मागूनही निधी मिळत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा तुघलकी कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा परिषद वर्तुळात होत आहे. राष्ट्रीय कार्यात सदा अग्रेसर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात सर्वात मोठी ओपीडी काढणारे म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले. डॉक्टरांच्या सेवेचा एकीकडे पाठ थोपटून गौरव होत असताना त्यांच आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सोयी सुविधा मागूनही मिळत नाही. ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची नाळ याच प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आहे. आदिवासी मागास भागाचे प्रतिनिधित्व करणारे फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र शासन दरबारी निधी मागूनही दुर्लक्षित केल्या गेले आहे.महागाव तालुक्यात सर्वात मोठे भौगोलिक कार्यक्षेत्र असलेल्या फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दगडथर, वडद आणि बिजोरा या उपकेंद्राचा समावेश होतो. विशेष म्हणजे फुलसावंगीसह सर्व उपकेंद्र मागास आदिवासी डोंगराळ भागात आहेत. डॉ. जब्बार पठाण, डॉ. नखाते आणि कर्मचारी सेवाभावीपणे रुग्ण सेवा करीत आहेत. डॉ. जब्बार पठाण कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणारे यशस्वी डॉक्टर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. श्रीमंत घरची मंडळी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घेतात. रोज ३०० ते ४०० रुग्णांची ओपीडी येथेच नोंदली जाते. राष्ट्रीय कार्य आणि रुग्णसेवा नित्याने होत असताना या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याच मूलभूत सुविधा नाहीत. जिल्हा परिषद सदस्या पंचफुलाबाई चव्हाण तसेच डॉ.बी.एन. चव्हाण यांनी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा पुरवण्यात याव्या म्हणून कित्येक वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना गळ घातली आहे. परंतु या ना त्या कारणाने येथे मागण्यात आलेला निधी फेटाळला आहे.प्राथिमक आरोग्य केंद्रात पाणी नाही. रस्ते खराब झाले, रुग्णाला औषध साठा नाही, वॉलकंपाऊंड नसल्यामुळे आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णाला पिण्यास पाणी नाही, या सर्व समस्या दूर करण्यासाठी डॉ.बी.एन. चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अजूनही प्रयत्नशी आहेत. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या मागणी प्रतिसाद देत नाहीत. एकीकडे राज्यपालाने गौरवलेले प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्लक्षित केल्या जाते तर आवश्यकता नसताना अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रावर लाखो रुपयांची उधळन सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)