नेरमध्ये अपघातात ऑटोरिक्षाचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2021 22:31 IST2021-02-02T22:30:41+5:302021-02-02T22:31:00+5:30
यवतमाळ : ऑटोरिक्षाला झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नेर-अमरावती मार्गावरील ...

नेरमध्ये अपघातात ऑटोरिक्षाचालक ठार
यवतमाळ: ऑटोरिक्षाला झालेल्या अपघातात २५ वर्षीय युवक ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. नेर-अमरावती मार्गावरील दोडकी गावाजवळ हा प्रकार घडला. प्रज्ज्वल काकडे (रा.वटफळा) असे मृताचे नाव आहे.
अपघात नेमका कसा झाला, हे मात्र कळू शकले नाही. प्रज्ज्वल हा ऑटोरिक्षा चालविण्याचा व्यवसाय करून उपजीविका करत होता. मंगळवारी तो ऑटोरिक्षा घेऊन व्यवसायाकरिता गेला होता. दरम्यान, ही घटना घडली.