जिल्ह्यात अव्वल अभयला उद्योगाचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 21:58 IST2019-05-28T21:58:12+5:302019-05-28T21:58:47+5:30
बारावीच्या निकालात जिल्ह्यात अव्वल ठरलेला अभय आशिष बाफना याने उच्च शिक्षणानंतर कुटुंबाच्या उद्योगाला हातभार लावून मोठे करण्याचे मनोगत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जाजू महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या अभयने ६१६ गुण मिळविले.

जिल्ह्यात अव्वल अभयला उद्योगाचे आकर्षण
यवतमाळ : बारावीच्या निकालात जिल्ह्यात अव्वल ठरलेला अभय आशिष बाफना याने उच्च शिक्षणानंतर कुटुंबाच्या उद्योगाला हातभार लावून मोठे करण्याचे मनोगत ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. जाजू महाविद्यालयातून शिक्षण घेणाऱ्या अभयने ६१६ गुण मिळविले. ९४.७७ टक्के गुणाने उत्तीर्ण झालेल्या अभयने गणितात ९९ गुण मिळविले आहेत. त्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यायचे आहे. मेकॅनिकल अथवा फूड टेक्नॉलाजीमध्ये त्याला शिकायचे आहे. त्याने जेईई मेन्समध्ये ९९.५७ टक्के गुण मिळविले आहेत. अभ्यासासाठी त्याने ध्यानसाधनेचा वापर केला. त्यातून एकाग्रता वाढल्याचे तो म्हणतो. अभयचे वडील व्यावसायिक, तर आई गृहिणी आहे. राठी क्लोससचे राजकुमार राठी आणि परेश राठी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अभयने सांगितले.