शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएसला अतिरेकी हालचालींचा संशय; अहिल्यानगर, यवतमाळमध्ये झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 05:07 IST

उमरखेड, पुसदमध्ये १४ ठिकाणी पहाटे एकाच वेळी पाेहाेचले पाेलिस

यवतमाळ/अहिल्यानगर : दहशतवादी हालचालींविषयी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत अचानक व्यापक शोधमोहीम राबवली. या कारवाईत अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

IND vs PAK : टीम इंडियाचा 'ई'शानदार विजय! पाकिस्तानचा धुव्वा उडवत दाबात मारली सुपर ८ मध्ये एन्ट्री

मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या या मोहिमेत दोन्ही जिल्ह्यांतील २१ हून अधिक ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईत डझनभराहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुसद व उमरखेड येथे १४ संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये शनिवारी रात्री ११ वाजेपासून रविवारी दुपारपर्यंत संशयितांची घरे, ऑफिसेस आदी ठिकाणी वॉरंटद्वारे झडती प्रक्रिया सुरू हाेती. आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, सीसीटीव्ही यांची तपासणी व जप्ती केली आहे. या प्रक्रियेमध्ये कोणालाही अटक केली नसून, संशयिताची सखोल विचारपूस केली जात आहे.

संशयितांची चौकशी, शोधमोहीम सुरूच

अहिल्यानगर जिल्ह्यातही सात ठिकाणी समान धर्तीवर छापेमारी करण्यात आली. तेथूनही संशयितांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. सर्व संशयितांची सध्या चौकशी सुरू असून शोधमोहीम अद्याप कायम आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर भागात रविवारी पहाटे एटीएस पथकाने छापे टाकले. काही घरांमध्ये पथकाकडून तपासणी सुरू असताना मुकुंदनगर भागात अहिल्यानगरचे स्थानिक पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला होता.

१२ संशयितांच्या घराची झाडाझडती

पुसद शहर पाेलिस ठाणे हद्दीत एका घरी व वसंतनगर येथे तब्बल १२ संशयितांच्या घराची दहशतवादविरोधी पथकाने झाडाझडती घेतली. एकाच वेळी १३ ठिकाणी धाड मारल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी लखनौ एटीएसने पाच वर्षांपूर्वी धर्मांतर प्रकरणात पुसद येथील एका डाॅक्टरला व यवतमाळ एका युवकाला ताब्यात घेतले हाेते.

उमरखेडमध्ये एका घरी तर पुसद शहरात १३ घरी एटीएस पथकाने धाड घातली. चौकशी करून तेथून काही साहित्य ज्यात मोबाइल, पुस्तक, लॅपटॉप, पेनड्राइव्ह हे जप्त केले. एटीएसची १५० जणांची टीम येथे आली होती. एटीएसचे आयजी चंद्रकिशोर मीना यांनीसुद्धा उमरखेड, पुसद शहर येऊन कारवाईची पाहणी केली.

कुमार चिंता, पोलिस अधीक्षक, यवतमाळ.

English
हिंदी सारांश
Web Title : ATS Suspects Terrorist Activity; Raids in Ahilyanagar, Yavatmal Conducted

Web Summary : Maharashtra ATS conducted raids in Ahilyanagar and Yavatmal following intelligence about terrorist activities. Several suspects were detained for questioning, and electronic devices were seized. Investigations are ongoing in multiple locations, with searches for incriminating materials continuing.