लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ निर्माण झाली आहे. राजू उईके असे या सहायक फौजदाराचे नाव आहे. ते लगतच्या वाघापूर येथील रहिवासी आहे. एएसआय राजू यांची रात्रगस्त होती. १ वाजेपर्यंत ते ड्युटीवरही होते. दरम्यान रात्री त्यांनी युनिफॉर्मवरच डीबी रुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी पोलीस कर्मचारी तेथे गेले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार धनंजय सायरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मात्र जात वैधता प्रमाणपत्रामुळे ते गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते, असे पोलीस कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आले
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 10:17 IST
येथील शहर पोलीस ठाण्याच्या डीबी रुममध्ये सहायक पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात सहायक फौजदाराची आत्महत्या
ठळक मुद्देशनिवारी उघडकीस आली घटना