विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 06:00 AM2020-02-08T06:00:00+5:302020-02-08T06:00:13+5:30

हैदराबादमध्ये महिला अत्याचार प्रकरणात जी कठोर भूमिका घेतली गेली, तशी कठोर भूमिका महाराष्ट्रातही घेण्याबाबत पावले उचलली जात असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कर्जमाफीऐवजी शेतकरी कर्जफेड असा शब्दप्रयोग सरकारने करावा, असे वक्तव्य डॉ. साळुंखे यांनी केले.

Assembly Speaker Nana Patole honored | विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा सत्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा शुक्रवारी येथे किसान काँग्रेसने नागरी सत्कार केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव कासावार होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार विजयाताई धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा, विदर्भातील रोजगार निर्मिती, तीर्थस्थळ व पर्यटनस्थळांचा विकास, महिलांवरील वाढते अत्याचार, ओबीसींची स्वतंत्र जनगणना अशा विविध मुद्यांवर विचार मांडले. हिंगणघाट येथील घटनेचा आम्ही निषेध करतो. हैदराबादमध्ये महिला अत्याचार प्रकरणात जी कठोर भूमिका घेतली गेली, तशी कठोर भूमिका महाराष्ट्रातही घेण्याबाबत पावले उचलली जात असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शेतकरी कर्जमाफीऐवजी शेतकरी कर्जफेड असा शब्दप्रयोग सरकारने करावा, असे वक्तव्य डॉ. साळुंखे यांनी केले. वामनराव कासावार, ख्वाजा बेग यांनीही यावेळी विचार मांडले.
विनोद पटोले, उमेश डांगे, राळेगाव बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. प्रफुल्ल मानकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, नगरसेविका वैशाली सवाई, मिलींद धुर्वे, संजय ठाकरे, हेमंत कांबळे, जावेद अन्सारी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी केले. सूत्रसंचालन विद्या चिंचोरे यांनी केले.
कळंब येथेही सत्कार
कळंब : येथील चिंतामणी मंदिरात नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर विकासाची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख, देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, सचिव श्याम केवटे आदी उपस्थित होते.

शेतकरी कलावंताचाही सन्मान
कार्यक्रमात येथील वसंतराव इंगोले या कलावंताने डोक्याने कॅशिओ तर नाकाने बासरी वाजविली. डफाच्या तालावर ‘शेतकरी आरती’ सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचा सत्कार करत १० हजार रुपयांचे पारितोषिकही दिले.

Web Title: Assembly Speaker Nana Patole honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.