मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकारांवरच केला सुपारी घेवून प्रश्न विचारीत असल्याचा आरोप

By सुरेंद्र राऊत | Published: November 11, 2022 03:09 PM2022-11-11T15:09:18+5:302022-11-11T15:10:37+5:30

Chirra Wagh: भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची शुक्रवारी यवतमाळमध्ये झालेली पत्रकार परिषद वादळी ठरली.

As soon as the issue of Minister Sanjay Rathod came up, Chitra Vagh got angry and accused journalists of taking betel nuts and asking questions. | मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकारांवरच केला सुपारी घेवून प्रश्न विचारीत असल्याचा आरोप

मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकारांवरच केला सुपारी घेवून प्रश्न विचारीत असल्याचा आरोप

Next

- सुरेंद्र राऊत 
यवतमाळ - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ यांची शुक्रवारी यवतमाळमध्ये झालेली पत्रकार परिषद वादळी ठरली. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला चित्रा वाघ यांनी त्यांची भूमिका मांडल्यानंतर पत्रकारांनी मंत्री संजय राठोड यांच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केला. संजय राठोड यांचा विषय संपला आहे, असे तुम्ही म्हणता, मग आघाडी सरकारच्या काळात केवळ राजकीय हेतूने तुम्ही त्यांच्यावर आरोप केले का, असे विचारताच चित्रा वाघ संतापल्या. मला प्रश्न विचारता तुम्ही न्यायालय आहात की न्यायाधीश, मी पाहीन काय करायचे ते, माझी लढाई सुरू आहे, मला शिकवू नका असे सांगत, असल्या पत्रकारांना यापुढे पत्रकार परिषदेला बोलावू नका, असे म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद सोडली.

भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा चित्रा वाघ यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी विदर्भ दौरा बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या मातृतीर्थापासून सुरू केला. शुक्रवारी त्या यवतमाळात आल्या. येथील विश्रामगृहावर त्यांनी पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत सुरुवातीला त्यांनी भाजप महिला मोर्चा महिला संघटन, महिलांचे सक्षमीकरण व महिलांविषयक शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या काळातील निर्णयांची माहिती दिली. तर महाविकास आघाडी सरकारच्या एकूणच धोरणावर टीका करीत उद्धव ठाकरेंनाही टार्गेट केले.



चित्रा वाघ यांची पत्रपरिषदेतील प्रस्तावना संपताच पत्रकारांनी मंत्री संजय राठोड व पूजा चव्हाण या संदर्भात वाघ यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल विचारणा केली. प्रश्न विचारता वाघ यांचा पारा चढला. त्यांनी संजय राठोड विरोधातील लढाई न्यायालयात सुरू असल्याचे सांगितले. यावर पत्रकारांनी राठोड यांचा राजीनामा मागण्यासाठी आपण लढा दिला, ती भूमिका राजकीय होती, तेव्हा संजय राठोड आरोपी होते, आता त्यांना क्लिनचीट मिळाली का असा प्रश्न करताच वाघ आणखीच भडकल्या. संजय राठोड यांचा कार्यकर्ता म्हणून विरोध कायम आहे. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडच गुन्हेगार आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. यावर आता राठोड यांच्या विषयाकडे आपण कानाडोळा करीत आहात, ते आघाडी सरकारमध्ये असताना आपण यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का, त्याद्वारे आपण त्यांचे राजकीय करिअर धोक्यात आणले, असा प्रश्न केला असता, चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राठोड विरोधात मी एकटीनेच लढा उभारला आहे. या प्रकरणात न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. या प्रकरणामुळे मला मागील वर्षभरात काय-काय सोसावे लागले, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.

संजय राठोड यांना क्लीनचिट दिली गेली असे म्हटले जाते, ही क्लीनचीट आघाडी सरकारच्या काळात  दिली आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या संदर्भातील प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले पाहिजे. मात्र तुम्ही एका महिलेला या प्रश्नावरून घेरत आहात, तुम्हाला लाज वाटत नाही का, असे वाघ म्हणाल्या. यावेळी पत्रकार आणि चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांवर तुम्ही सुपारी घेवून प्रश्न विचारात आहात, असा थेट आरोप केला आणि अशा पत्रकारांना यापुढे माझ्या पत्रकार परिषदेला बोलवत जावू नका असे सांगत, त्या पत्रकार परिषदेतून आमदार माजी मंत्री अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार, आमदार नीलय नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा या पदाधिकाऱ्यांसह बाहेर पडल्या.

Web Title: As soon as the issue of Minister Sanjay Rathod came up, Chitra Vagh got angry and accused journalists of taking betel nuts and asking questions.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.