शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

‘यवतमाळ फेस्टिवल’मध्ये कलागुणांची उधळण

By admin | Updated: October 10, 2016 01:54 IST

यवतमाळ फेस्टिवल आयोजन समिती अंतर्गत येथील समता मैदानावर आयोजित ‘यवतमाळ फेस्टीवल-

यवतमाळ : यवतमाळ फेस्टिवल आयोजन समिती अंतर्गत येथील समता मैदानावर आयोजित ‘यवतमाळ फेस्टीवल-२०१६’ मध्ये कलावंतांनी आपल्यातील कलागुणांची उधळण केली. सुपर डान्सर अँड सिंगरमध्ये समूहनृत्य, गीतनृत्य आदी कलांचे सादरीकरण करण्यात आले. यवतमाळ फेस्टीवल या कला महोत्सवाच्या उद्घाटनाला अभिनेत्री पूजा तायडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती लाभली होती. उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ‘बाणाई’चे अध्यक्ष दीपक नगराळे होते. समाज कल्याण अधिकारी जया राऊत, अशोक वानखडे, किशोर भगत, डॉ. रजनी कांबळे, ज्ञानेश्वर गोबरे, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, राजकुमार भितकर, स्मिता उके आदींची अतिथी म्हणून उपस्थिती होती. फेस्टीवल समितीच्या अध्यक्ष ममता महाडोळे यांनी हा उपक्रम सर्वांसाठी सुवर्णसंधी असून मनोरंजनातून प्रबोधनाकडे जाण्याचा उत्तम मार्ग असल्याचे मत व्यक्त केले. फेस्टीवलच्या सचिव स्मिता उके म्हणाल्या, नव्या पिढीच्या कलावंतांना घडविण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसंगी अभिनेत्री पूजा तायडे यांनी मार्गदर्शन केले. यवतमाळच्या मातीबद्दल खूप ऐकून होते. प्रत्यक्षात आल्यानंतर या मातीच्या कुशीत हरहुन्नरी कलावंत असल्याचे सांगत, यवतमाळ ही कलेची खाण असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले. सायंकाळी विविध कलांचे सादरीकरण झाले. आयोजन समितीचे संयोजक दीपक नगराळे यांनी ‘कैसे हम प्यार ने हमसे क्या क्या खेल दिखाये’ हे दर्द भरे गीत प्रस्तुत केले. आयोजन समितीच्या रचना सोनवणे, रश्मी खडसे यांनी नृत्य सादर केले. नृत्यांगण बॉईज, लाल भैरिया ग्रुप, राधा नाचेगी ग्रुप, नृत्यांगणा गर्ल्स अँड बॉईज यांनी विविधांगी कला सादर केल्या. भावना बावने यांनी नृत्य सादर केले. स्नेहल नगराळे, वंदन राऊत, आकाश तांबे, प्रशांत डेहनकर, अर्णवी बोरीकर, सई येलनारे, देवराज हलवार, रोशन लोहावे आदींनी सुरेल गीते सादर केली. विधी विश्वास अंभोरे हिने ‘राधा नाचे’ हे नृत्य प्रस्तुत केले. उद्घाटन सत्र व सुपर डान्सर अँड सिंगर कार्यक्रमाचे संचालन अनुक्रमे अर्चना खरतडे, नीकिता तांडेकर यांनी केले. यावेळी वंदना संजय राठोड (बोथबोडन), ऋषिकेश जाधव (किन्हाळा) या आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना पाहुण्यांच्या हस्ते मदत देण्यात आली. आभार जयश्री भगत, पुष्पलता वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविता भोवते, मंगला दिघाडे, राखी भगत, उज्ज्वला इंगोले, लोपामुद्रा पाटील, माया गोबरे, सुनीता काळे, प्रिया वाकडे, एकता वाणी, रंजना नगराळे, प्रा. भावना भगत, प्रा. रिना पानतावणे, अंजली मेश्राम, प्रतिज्ञा कुळसंगे, वैशाली फुसे, निता दरणे, सीमा महाडोळे, सुषमा बरडे, कल्पना गोफणे, जया नरांजे, डॉ. स्मिता गवई आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)