शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी तालुक्याला झोडपले; 105 मिमी विक्रमी पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी एसटी महामंडळाने मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने दहा बसफेऱ्या रद्द केल्या. दोन दिवसांपूर्वी मुकुटनब-पाटण मार्गावरील वळण रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

ठळक मुद्देउमरखेडमध्ये आज शाळांना सुट्टी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३५.७ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील दहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. तर आर्णी तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले असून, या तालुक्यात २४ तासांमध्ये १०५ मि. मी. एवढा विक्रमी पाऊस नाेंदविला गेला आहे. मंगळवारीही पावसाचा जाेर कायम असून, पावसामुळे काही भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य हवालदिल झाले होते. मात्र, मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत यवतमाळ तालुक्यात २१.२, बाभूळगाव १०.९, कळंब २१.६, दारव्हा १९.४, दिग्रस ४३.७, आर्णी १०५.५, नेर २२.६, पुसद १६.५, उमरखेड २५.५, महागाव ४०, वणी ५४.३, मारेगाव १९.६, झरीजामणी ५५.२, केळापूर ४४.२, घाटंजी ५७, तर राळेगाव तालुक्यात २५.६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.  मंगळवारीही यवतमाळसह जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरू होती. 

पुराने अडविले रस्ते, दहा बसफेऱ्या केल्या रद्द- पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्या ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याने काही ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे. मंगळवारी एसटी महामंडळाने मार्ग वाहतुकीयोग्य नसल्याने दहा बसफेऱ्या रद्द केल्या. दोन दिवसांपूर्वी मुकुटनब-पाटण मार्गावरील वळण रस्ता वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे. अंजनखेड-राणी धानोरा रस्ताही वाहतुकीयोग्य नसल्याने या मार्गावरील बसफेऱ्या रद्द करून बसचा मार्ग बदलविण्यात आल्याची माहिती महामंडळाच्या वतीने देण्यात आली.

उमरखेडमध्ये आज शाळांना सुट्टी- संततधार पावसामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उमरखेड शहरासह तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि शासकीय, निमशासकीय काॅलेजला एक दिवस बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले आहे. तालुक्यात तीन-चार दिवसांपासून पाऊस असल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर