शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

महागाईविरूद्ध आर्णीत काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 5:00 AM

महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे.

ठळक मुद्देशिवनेरी चौकात घोषणाबाजी : भजे तळून केला केंद्र सरकारचा निषेध, अनेकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : जवळपास दीड वर्षांपासून कोरोना व त्या अनुषंगाने लावलेली टाळेबंदी, यामुळे व्यापारी, मध्यमवर्गीय, शेतकरी यांच्यासह सर्वांचे प्रचंड नुकसान झाले. हातावर पोट असणाऱ्या गरिबांची तर वाईट परिस्थिती झाली. त्यात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे बुधवारी काँग्रेसने येथील शिवनेरी चौकात केंद्र सरकारचा निषेध करीत आंदोलन केले.महागाईमुळे ज्यांना कोरोना उपचाराचा खर्च उचलावा लागला, अशा कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णतः विस्कटली आहे. कित्येक ठिकाणी घरातील कर्ता गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार मात्र भाववाढ करून नफा कमविण्यात गुंग आहे, असा आरोप काँग्रेसने केला. कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी असूनही देशात पेट्रोल-डिझेलचे दर वधारले आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम स्वयंपाक घरातील वस्तूंच्या किमतीवर झाला. अत्यावश्यक घरगुती गॅसचे दर ८५० रुपये झाले. आता सबसिडी नाममात्र उरली. मोठ्या थाटामाटात मोदी सरकारने ‘उज्ज्वला’ योजनेचा प्रचार केला. २०१९ च्या निवडणुकीत महिलांची मतेही घेतली. मात्र, सध्या खरचं लाभार्थ्यांना महागडा गॅस परवडतो का, असा प्रश्नही उपस्थित केला. खाद्य तेलाचे दर ६ महिन्यात दुप्पट झाले. केंद्र सरकारने खाद्य तेल जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकल्याने साठेबाजी व नफेखोरी फोफावत आहे. तूर डाळ व इतर डाळींचे दर आवाक्याबाहेर गेले आहे. गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या महागाईचा निषेध करण्याकरिता तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने येथे निदर्शने केली.आंदोलनात जितेंद्र मोघे, साजीद बेग, आरिज बेग, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, विजय मोघे, छोटू देशमुख, गुणवंत राऊत, सुनील भारती, सभापती विलास अगलधरे, नीता ठाकरे, खुशाल ठाकरे, पंडित बुटले, निलेश बुटले, अनिता भगत, स्मिता वानखडे, रेणुका बोईनवार, वंदना गावंडे, ज्योती मोरकर, ज्योती आरणकर, भाग्यश्री भवरे, कांचन भगत, सुरेखा देमापुरे, अनिल भगत, संजय राऊत, अनंता कांबळे, गजानन काळे, उमेश आचमवार, नालंदा भरणे, तारासिंग राठोड, तन्मय बागूल, सतीश धाये, अलिम देशमुख, यादवराव वंजारी आदी सहभागी होते.

सबसिडी नाममात्र

इंधन व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहे. दुसरीकडे सिलिंडरवरील सबसिडी नाममात्र उरल्याचा आरोप काँग्रेसने केला. सिलिंडरचे दर वाढल्याने उज्ज्वला योजनाही कुचकामी ठरली आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना सिलिंडर भरून आणणेही परवडत नाही. त्यामुळे लाभार्थीसुद्धा हवालदिल झाले. केंद्र सरकारला या वाढत्या महागाईबाबत कोणतीही चिंता नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

 

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन