शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल"; मुजोर अग्रवालची पोलिस आयुक्तालयातच पत्रकारांना धमकी
2
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
3
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
4
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
5
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
6
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
7
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
8
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
9
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका
10
सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 
11
पाकची ताकद किती? हे पाहण्यासाठी लाहोरला गेलो; मणिशंकर यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांचे प्रत्युत्तर 
12
लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल
13
डोंबिवली हादरली; एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यातील रिॲक्टरचा स्फोट; २०१६ च्या आठवणी जाग्या
14
काँग्रेसला ४० जागा मिळणेही अवघड आहे; पाच वर्षांत पाच पंतप्रधान बघावे लागतील - शाह
15
छत्तीसगडमध्ये चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा; अनेक जण जखमी; मोठा शस्त्रसाठा जप्त
16
बुडालेल्या युवकाचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ जवानांची बोट उलटली, 6 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले, 1 बेपत्ता, 2 रुग्णालयात
17
प्रज्वल देशात परत ये अन् शरण जा; देवेगौडा यांचे पत्र
18
भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी
19
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
20
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले

वीज मीटर रीडरच्या थापेबाजीला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 9:46 PM

फाटकाला कुलूप होते, घरी कुणी नव्हते, मीटर उंचावर आहे आदी कारणे देत मीटर रीडींग घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मीटर रीडरच्या थापेबाजीला सप्लाय कोड नियमानुसार चाप लावता येतो. नियमित रीडींग होत नसलेल्या ग्राहकांनी या कोडच्या माध्यमातून नुकसान भरपाई मागितल्यास सदर प्रकाराला नियंत्रणात आणले जाऊ शकते.

ठळक मुद्देसप्लाय कोड नियम : ग्राहकांना नुकसान भरपाईचा अधिकार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : फाटकाला कुलूप होते, घरी कुणी नव्हते, मीटर उंचावर आहे आदी कारणे देत मीटर रीडींग घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मीटर रीडरच्या थापेबाजीला सप्लाय कोड नियमानुसार चाप लावता येतो. नियमित रीडींग होत नसलेल्या ग्राहकांनी या कोडच्या माध्यमातून नुकसान भरपाई मागितल्यास सदर प्रकाराला नियंत्रणात आणले जाऊ शकते. वीज कंपनीनेही नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे, असे वीज ग्राहक संघटनेने म्हटले आहे.सप्लाय कोड विनियम २००५, विनियम १४.३ नुसार ग्राहकांच्या मीटरची नोंद (मीटर रीडींग) दोन महिन्यातून किमान एकदा व्हायलाच पाहिजे. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून रीडींग होत नसल्यास ग्राहक विद्युत कंपनीकडे भरपाई मागू शकतो. तिसऱ्या महिन्यात एकदम रीडींग नेल्यास १०० रुपये व तीन महिन्याच्यावर रीडींग होत नसल्यास चौथ्या महिन्यापासून दरमहा २०० रुपये नुकसान भरपाई कंपनीकडे मागण्याचा अधिकार ग्राहकाला आहे.मीटरमधील बिघाडामुळे वीज वापराची चुकीची नोंद होते. मीटरविषयी शंका असल्यास तक्रार करून प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो. जास्तीत जास्त तीन महिन्यांच्या बिलांमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते. मीटर जळाल्यास ग्राहकांना नवीन मीटरची किंमत भरावी लागते.या सर्व बाबी ग्राहकांनी काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे, असे विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी जागृततेच्यादृष्टीने नमूद केले आहे.पाच वर्षात एकदा तपासणी आवश्यकवीज मीटरची तपासणीही महत्त्वाची आहे. दर पाच वर्षात किमान एकदा तरी तपासणी केली जावी, सोबतच अर्थिंगचीही तपासणी करण्यात यावी. मीटर फास्ट अथवा स्लो असल्यास सिंगल फेज १०० रुपये व थ्री फेज ३०० रुपये तपासणी शुल्क भरून तपासून घेता येते. बंद पडलेल्या मीटरसाठी वीज कंपनी ग्राहकाकडून मीटर बंद पडल्याची माहिती मिळाल्यापासून जास्तीत जास्त मागील तीन महिन्यापर्यंतच्याच वीज बिलाची मागणी करू शकते, असे विदर्भ वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :electricityवीज