निवडणुकीसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By Admin | Updated: October 14, 2014 23:25 IST2014-10-14T23:25:41+5:302014-10-14T23:25:41+5:30

वणी विधानसभा (७६) या मतदार संघासाठी बुधवारी १५ आॅक्टोबरला एकूण ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहे़ त्यापैकी केवळ पाच केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले असून या केंद्रांवर

Appointment of 1.5 thousand employees for elections | निवडणुकीसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

निवडणुकीसाठी दीड हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

विनोद ताजने - वणी
वणी विधानसभा (७६) या मतदार संघासाठी बुधवारी १५ आॅक्टोबरला एकूण ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहे़ त्यापैकी केवळ पाच केंद्र संवेदनशील ठरविण्यात आले असून या केंद्रांवर निवडणूक विभागाची विशेष नजर राहणार आहे़
वणी विधानसभा मतदार संघात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील मतदारांचा समावेश आहे़ नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा ११ हजार मतदार यावेळी वाढले आहेत़ आता १ लाख ४१ हजार २१४ पुरूष मतदार, तर १ लाख २७ हजार ३२४ महिला मतदार व एक अन्य मतदार असे एकूण २ लाख ६८ हजार ३३९ मतदार आहेत़ निवडणुकीसाठी एकूण २७ झोन पाडण्यात आले आहेत. प्रत्येक झोनमध्ये मतदान केंद्र ठेवण्यात आले आहेत़
एकूण ३०७ मतदान केंद्र व दोन साहाय्यकारी मतदान केंद्र, अशा ३०९ मतदान केंद्रावरून मतदान घेतले जाणार आहेत़ त्यासाठी ३३८ मतदान टीम मंगळवारी रवाना झाल्या आहेत. ३३८ मतदान केंद्राध्यक्ष व १ हजार १४ मतदान अधिकारी तसेच १० महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ यापैकी पाच मतदान केंद्र संवेदनशील गटात मोडणारे आहेत़ वणी शहरातील केंद्र क्रमांक १२६, १२७, १२८ व भालर येथील केंद्र क्रमांक १७९ या केंद्रांवर मतदान ओळखपत्रांची संख्या अत्यल्प असल्याने ते क्रिटिकल ठरविण्यात आले आहेत़ साखरा (को़) केंद्र क्ऱ २९५ हे फॅमिनी लिंकेजअभावी क्रिटिकल ठरविण्यात आले आहेत़
मतदान काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकर व ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी पोलीस यंत्रणा कामाला लावले आहेत़ त्यासाठी सिक्कीम येथील कमांडोंची अतिरिक्त कुमक येथे देण्यात आली आहे़ या तुकडीने विविध भागात पथसंचलन करून वचक निर्माण केला आहे़ शहराबाहेरील प्रत्येक चौकात वाहनांची तपासणी करून पैसा व दारू वितरणावर लगाम लावण्याचा प्रयत्न सुरू आहे़
मारेगाव, शिरपूर, मुकुटबन व पाटण येथील ठाणेदारांनीही आपल्या अधिनस्त पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क केले आहेत़ प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलीस व एक होमगार्ड देण्यात आला आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पोलिसांची फिरती पथकेही कार्यरत राहणार आहे़

Web Title: Appointment of 1.5 thousand employees for elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.