यवतमाळात अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव
By Admin | Updated: February 1, 2015 23:05 IST2015-02-01T23:05:24+5:302015-02-01T23:05:24+5:30
श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक श्री संघाच्यावतीने येथील केसरिया भवनमध्ये अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २ ते १२ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक

यवतमाळात अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव
यवतमाळ : श्री जैन श्वेतांबर मूर्तीपूजक श्री संघाच्यावतीने येथील केसरिया भवनमध्ये अंजनशलाका प्रतिष्ठा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २ ते १२ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक सोहळ््याने हा महोत्सव साजरा केला जात आहे.
या महोत्सवात भगवान श्री सुमतीनाथ, श्री आदिनाथ, श्री पार्श्वनाथ, श्री सीमंधस्वामी यांच्या मूूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. तसेच गुरू गौतम स्वामी, श्री कलापूर्णासुरी महाराज गुरूमंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. महोत्सवाचा २ फेब्रुवारीला प्रारंभ होत असला तरी रविवारी प्रतिष्ठाचार्य श्रीमद् विजय पूर्णचंद्रसुरीश्वरजी महाराजांचा मंगल प्रवेश सोहळा घेण्यात आला. यावेळी २७ साध्वी आणि सात साधुंच्या समवेत श्रावक, श्राविका उपस्थित होत्या. महोत्सवाची सुरूवात सोमवारी सकाळी स्नात्रपुजा अभिषेकाने केली जाणार आहे. यात जलयात्रा विधान, कुंभस्थापना, दीपक स्थापना, माणकस्तंभ स्थापना आणि ज्वारारोपणाचा विधी केला जाणार आहे.
कार्यक्रमाचे प्रतिष्ठिताचार्य श्रीमद् विजय पूर्णचंद्रसुरीश्वरजी यांचा ४३ वा दीक्षा दिन चारित्र्य वंदना समारोहाच्या रुपात साजरा केला जाणार आहे. रात्री आंगी-रोशनी-भक्ती संध्या होणार आहे. मंगळवारी दादा गुरूदेव पूजन होणार आहे. यासाठी विदर्भातील प्रसिद्ध गुरू कोठारी यांची हौजी भक्तीसंध्या आयोजित केली आहे. बुधवारी ४ फेब्रुवारीला ९९ प्रकारची पुजाविधी होणार आहे. गुरूवारी १२ व्रत पूजन आणि रात्री भक्तीसंध्या आयोजित केली आहे.
महोत्सवाचा मुख्य सोहळा ६ फेब्रुवारीला प्रभुचे चवन कल्याण, जन्मकल्याण, दीक्षा कल्याण केवळ ज्ञान कल्याणक, मोक्ष कल्याणक, हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी उजैन येथील आशुतोष मंडळाच्या २४ कलावंतांचा संच भक्ती प्रदर्शन करणार आहे. सायंकाळी मां की ममता या विषयावर भक्ती संध्या आहे. ७ फेब्रुवारीला प्रभूचवन कल्याणक अंजनशलाका नाट्य प्रस्तुती होणार आहे. १०८ पार्श्वमहापूजन यासोबतच जालना येथील मेहूल रुपडा भक्तीमंडळ भक्तीसंध्या सादर करणार आहे. ८ फेब्रुवारीला प्रभुचा जन्मकल्याणक नाट्यप्रस्तुती सादर केली जाणार आहे. ६४ इंद्रव्दारा मेरूशिखरावर अभिषेक हे याचे विशेष आकर्षण राहणार आहे. दुपारी १८ अभिषेक, रात्री हैद्राबाद येथील १२ वर्षीय संयम नाबेडा यांची भक्तीसंध्या आहे. ९ फेब्रुवारीला प्रभूची जन्ममहोत्सव नाट्यप्रस्तुत वेदनिय कर्मनिवारण पूजा होणार आहे. नाशिक येथील भावेश शाहा यांची भक्तीसंध्या आहे. १० फेब्रुवारीला दीक्षा कल्याणक नाट्यप्रस्तुती सादर होणार प्रतिष्ठा चढावे की बोली लागणार आहे. कुमारपाल महाराज महाआरती करणार आहे. रात्री अंजनशलाका विधी केला जाणार आहे. ११ फेब्रुवारीला महामंगलकारी प्रतिष्ठा विधान सोहळा आहे. यावेळी मंदिरावर मानव विरहीत विमानातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. १२ फेब्रुवारीला अखेरच्या दिवशी नवनिर्मिती प्रतिष्ठीत झालेल्या व्दाराचे उद्घाटन केले जाणार आहे. ७० भेदी पूजा केल्यानंतर या सोहळ््याची सांगता होणार आहे. जैन समाज बांधवांनी सोहळ््याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (शहर वार्ताहर)