यवतमाळ जिल्ह्यात संतप्त महिलांनी जाळली पानटपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 12:07 IST2018-06-19T12:07:47+5:302018-06-19T12:07:59+5:30
वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानटपरीतून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानटपरी पेटवून दिली.

यवतमाळ जिल्ह्यात संतप्त महिलांनी जाळली पानटपरी
ठळक मुद्देअवैध दारु विक्री होत असल्याने संताप
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वणी तालुक्यातील नायगावलगत एका पानटपरीतून अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी सदर पानटपरी पेटवून दिली. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तणावाची स्थिती निर्माण झाली. अवैध दारूविक्रेत्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचला आहे.