शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिका, सफाई कामगार ठरले देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

यवतमाळ पालिकेच्या अखत्यारीतील तीन भाग प्रतिबंधित आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे. याच परिसराला सुरक्षित ठेवण्याची पहिली जबाबदारी सफाई कामगारांवर आली. इंदिरानगर, जाफरनगर, मेमन कॉलनी, पवारपुरा या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच परिसरात सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. या परिसरात दिवसातून दोनदा जंतू विरहित फवारणी करून स्वच्छता ठेवली जात आहे.

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करीत आहे. नर्स, सफाई कामगार आणि डॉक्टरांचा यामध्ये समावेश आहे. समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून हे सर्व जण काम करीत असल्याने तेच खरे देवदूत ठरले आहे.यवतमाळ पालिकेच्या अखत्यारीतील तीन भाग प्रतिबंधित आहे. हा परिसर सील करण्यात आला आहे. याच परिसराला सुरक्षित ठेवण्याची पहिली जबाबदारी सफाई कामगारांवर आली. इंदिरानगर, जाफरनगर, मेमन कॉलनी, पवारपुरा या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळताच परिसरात सोडियम हायड्रोक्लोराईडची फवारणी करण्यात आली. या परिसरात दिवसातून दोनदा जंतू विरहित फवारणी करून स्वच्छता ठेवली जात आहे. ही कामे सफाई कामगार पार पाडत आहे. हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यापासून नाल्या साफ करणे, रस्ते स्वच्छ करणे ही कामे महिला आणि पुरूष कामगार प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहे. या भागात पाय ठेवण्यास नागरिकांना बंदी आहे. मात्र त्याच भागाला सुरक्षित ठेवण्याचे काम अनेक महिला सफाई कर्मचारी पार पाडत आहे. केवळ तोंडाला मास्क लावून हातात हॅन्ड ग्लोज असो अथवा नसो, ही मंडळी अविरत कार्यरत आहे.दररोज आठ ते १० तास ही मंडळी काम करीत आहे. उन्हातान्हात धापा टाकत त्यांचे कार्य सुरू आहे. केवळ जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांंची धडपड सुरू आहे. अतिरिक्त काम करून हे सफाई कामगार संकटसमयी जनतेच्या मदतीला धावून आले आहे. काम करताना त्यांची कुणी हेटाळणीही करतात. मात्र ते उपाययोजनेत मग्न असतात. एकप्रकारे त्यांनी स्वच्छतेचे व्रत हाती घेतले आहे. या व्रतापासून पराववृत्त न होण्याचा निर्धार त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. हे काम करताना त्यांना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी ते दररोज आपल्या आहारात कडधान्याचा वापर करीत आहे. घरी परतल्यानंतर अंगावरील संपूर्ण कपडे एका बाजूला सारून स्वच्छ करतात. आंघोळीनंतरच घरात प्रवेश करतात. आपण सुरक्षित, तर कुटुंब सुरक्षित, याची त्यांना जाणीव आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांची सत्वपरीक्षाकोरोनाविरूद्धच्या लढाईत आरोग्य कर्मचाऱ्यांची खरी सत्व परीक्षा आहे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष आरोग्य सेवेची जबाबदारी पार पाडणाऱ्या आरोग्य सेविका आणि डॉक्टरांचा संपर्क कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रूग्णांशी येतो. यासाठी संरक्षण म्हणून पीपीई किट, एचआयव्ही किटचा वापर केला जातो. घरी गेल्यांनतर ही सर्व वस्त्रे काढून ठेवल्यानंतर आंघोळ करायची, नंतरच घरात प्रवेश करायचा, असा त्यांचा दिनक्रम आहे. दररोज १२ तास काम करावे लागत असून अनेकदा इमर्जन्सी म्हणूनही आरोग्य सेविकांना जबाबदारी सांभाळावी लागत आहे.काम करताना सतावते चिंताआशिष, कन्हय्या, अमोल यांनी सफाईचे काम करताना आपल्याला अनेकदा चिंता वाटत असल्याची भावना व्यक्त केली. मात्र घरात आमच्याशिवाय काम करणारे कुणीच नसल्याने आम्ही प्रतिबंधित क्षेत्रातही स्वच्छतेसाठी तयार असल्याचे सांगितले. विश्ेष म्हणजे काम करताना स्वच्छता आणि सोशल डिस्टन्स पाळले जात असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.गमबूट, हॅन्डग्लोज, सॅनिटायझरचे वाहन अमरावतीत अडकलेस्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे बहुतांश कर्मचारी कंत्राटी आहे. कंत्राटदारांनी त्यांच्यासाठी गमबूट, हॅन्डग्लोज आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. मात्र हे साहित्य घेऊन येणारे वाहन अमरावतीत अडकले आहे. यामुळे मिळेल त्या साधनाच्या मदतीने सफाई कामगार काम करीत आहे.आम्हाला केवळ नागरिकांची काळजीआरोग्य संवर्धन आणि नागरिकांची काळजी घेणे, आमचे प्रथम कर्तव्य असल्याचे मत अनेक सफाई कामगारांनी व्यक्त केले. तसेच कुटुंबाचीही काळजी घेत असल्याचे त्यांनी सांगितले. कुणालाही कोरोनाचा संसर्ग होऊ नये, अशी प्रार्थना त्यांनी केली. जनतेच्या आरोग्यासाठी या सफाई कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घातला आहे. केवळ नागरिक सुरक्षित राहावे म्हणून त्यांची धडपड सुरू आहे.निवासाची स्वतंत्र व्यवस्था हवीकोरोनाबाधीत आणि संशयितांना येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ ठेवले जाते. मात्र त्यांच्या सानिध्यात येऊन उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना संसर्ग होणयाचा धोका आहे. त्यासाठी प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्ससाठी निवासाची स्वतंत्र व्यवस्था करायला हवी, असे मत काही डॉक्टरांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केले.जनतेच्या भल्यासाठी अविरत सेवाआरोग्य सेविका, आरोग्य सेवक आणि डॉक्टर अविरतपणे कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. ते स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आहे. सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज आणि किट्सचा वापर करीत आहे. आहारामध्ये कडधान्याचा वापर केला जातो. मात्र खूपच काळजीपूर्वीक काम करावे लागते. सतत कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती सतावते. तथापि जनतेच्या भल्यासाठी त्यांची अविरत सेवा सुरूच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या