कोरोनाचे सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 09:38 IST2020-04-23T09:38:00+5:302020-04-23T09:38:24+5:30
संध्या यांचा कोरोंनाने मृत्यू झाला काय, याचा अहवाल मागविला जाणार आहे.

कोरोनाचे सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू
यवतमाळ : कळंब तालुक्याच्या जोडमोहा येथील अंगणवाडी सेविकेचा सर्वेक्षण करताना मृत्यू झाला. संध्या सज्जनवार असे त्यांचे नाव आहे. त्या दोन दिवसांपूर्वी आजारी पडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनाकरिता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
संध्या यांचा कोरोंनाने मृत्यू झाला काय, याचा अहवाल मागविला जाणार आहे. दरम्यान आयटक संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप उटाणे यांनी अंगणवाडी सेविका कोरोनाच्या कामात व्यस्त होती, यामुळे सरकारने जाहीर केलेला 50 लाखाचा विमा कुटुंबाला द्यावा, अशी मागणी यवतमाळ जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांच्याकडे केली आहे.