आठव्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2022 05:00 IST2022-04-16T05:00:00+5:302022-04-16T05:00:15+5:30

प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर असे मृताचे नाव आहे. ते वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सून व  नातवंडासह शहरातील शेवाळकर परिसरातील स्नेहगोत्री नामक इमारतीच्या आठव्या मजल्यावर बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी पहाटे ते उठले. त्यानंतर ते घराच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेले. गॅलरीत फिरताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते आठव्या मजल्यावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

An old man died after falling from the eighth floor | आठव्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

आठव्या मजल्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पहाटेच्या वेळी गॅलरीत फिरत असलेल्या एका वृद्धाचा तोल जाऊन आठव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील यवतमाळ मार्गावरील शेवाळकर परिसरात ही घटना घडली. 
प्रभाकर गोविंदराव पाथ्रडकर असे मृताचे नाव आहे. ते वेकोलितील सेवानिवृत्त कर्मचारी होते. ते त्यांचा मुलगा, सून व  नातवंडासह शहरातील शेवाळकर परिसरातील स्नेहगोत्री नामक इमारतीच्या आठव्या मजल्यावर बी-विंगमध्ये वास्तव्याला होते. शुक्रवारी पहाटे ते उठले. त्यानंतर ते घराच्या गॅलरीत फिरण्यासाठी गेले. गॅलरीत फिरताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते आठव्या मजल्यावरून खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आठव्या माळ्यावरून खाली पडल्याचे परिसरातील सुरक्षारक्षकाच्या लक्षात आले. सुरक्षारक्षकाने या घटनेची माहिती लगेच त्यांच्या कुटुंबाला दिली. कुटुंबीयांनी तातडीने त्यांना रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती होताच, नागरिकांनी घटनास्थळ व रुग्णालयात एकच गर्दी केली होती. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ पाथ्रडकर यांचे ते बंधू होते. 

दोन वर्षांपासून होते पक्षाघाताने आजारी
मृत प्रभाकर पाथ्रडकर हे गेल्या दोन वर्षांपासून पक्षाघाताने आजारी होते. त्यामुळे चालताना त्यांचा बॅलेंस जात होता. ही बाब कुटुंबीयांना माहीत असल्याने ते घराची गॅलरी बंदच ठेवायचे. मात्र शुक्रवारी पहाटे प्रभाकर पाथ्रडकर गॅलरीत गेले. तेथे फिरत असताना त्यांचा तोल जाऊन ते आठव्या मजल्यावरून खाली कोसळले.

 

Web Title: An old man died after falling from the eighth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.